खळबळजनक : सावद्यात जुगार अड्ड्यावर बनावट नोटा? जुगार अड्डे बनावट नोटा खपाविण्याचे केंद्र? चर्चेला उधाण
सावदा, ता. रावेर, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l रावेर तालुक्यातील सावदा शहरातून ख्वाजा नगर मधील दोन आरोपींना बनावट नोटा बाळगत असल्या प्रकरणी अटक करण्यात आली. त्यांच्या कडून १०० रुपयांच्या ७६ बनावट नोटा जप्त करण्यात आल्या होत्या. या बनावट नोटा जुगार अड्ड्यावर पकडल्याची खात्रीशीर माहिती मिळत आहे. यातील तिसऱ्या आरोपीला ही अटक करण्यात आली. तिसरा आरोपी आवेश याच्या भुसावळ येथील घराची झडती घेतली असता त्याच्या घरातून पुन्हा दहा हजारांच्या बनावट चलनी नोटा जप्त करण्यात आल्या. बनावट नोटा कोठून, कोणी पुरविल्या त्यांनी स्वतः मुद्रित केल्या काय? यांचा मुख्यसुत्रधार कोण? हे अद्याप समोर आलेले नाही.
जुगार अड्ड्याद्वारे बनावट नोटा चलनात ? . या बनावट नोटा सावदा परिसरातील सावदा स्टेशन रस्त्यावरील लहान वघोदा जुगार अड्ड्यावर चलनात आल्याची माहिती मिळत असून बाहेर मार्केट मध्येही बनावट नोटा चलनात आणल्याची शक्यता नाकारता येत नाही. जुगार अड्ड्याद्वारे या चलनी बनावट नोटा चलनात तर आणल्या गेल्या तर नाही ना? अशी शंका उपस्थित केली जात आहे.या बाबत मोठ्या प्रमाणावर हा विषय चर्चिला जात आहे.
१३ डिसेंबर शुक्रवार रोजी बनावट चलनी नोटा प्रकरणी शहरातील शेख आरिफ व अझरखन अय्युब खान याना अटक केली. त्यांच्या कडून १०० रुपयांच्या ७६ बनावट नोटा जप्त केल्या. यात आणखी दोघांना बनावट नोटा पुरविणाऱ्या तिसऱ्या आरोपी आवेश लाही अटक करण्यात आली.
मिळालेल्या माहिती नुसार, या बनावट नोटा सावदा परिसरातील स्टेशन रस्त्यावरील वाघोदा येथील जुगार अड्ड्यावर चालविलेल्या गेल्याची चर्चा मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. जुगार अड्ड्यावर बनावट चलनी नोटा चालविलेल्या गेल्या म्हणजेच बाहेर चलनातही बनावट नोटा चालविलेल्या गेल्या काय? परिसरात बनावट नोटा चलनात आणल्या गेल्याची शक्यता नाकारता येत नाही. या बनावट नोटा पुरविणाऱ्याचे रॅकेट असण्याची शक्यता नाकारता येत नाही. या घटनेची उच्चस्तरीय चौकशी केली जावी अशी मागणी परिसरातून केली जात आहे. ………….!