धक्कादायक : अल्पवयीन मुलीच्या तोंडात व डोळ्यात रेती टाकून सामूहिक अत्याचार, चार जणांना अटक
मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l एक संतापजनक तेव्हढीच धक्कादायक घटना समोर आली आहे. एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार करण्यात आला आहे. अमरावती मधील ही सामूहिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना आहे. अमरावतीच्या चांदूर रेल्वे पोलीस स्टेशन अंतर्गत ही घटना घडली असून या भयंकर घटनेनं शहर हादरलं आहे.
सामूहिक अत्याचार करून पिडीत मुलीस जिवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला इतकेच नव्हे तर नराधमांनी पीडितेवर तोंडात व डोळ्यात रेती टाकून अत्याचार झाला असल्याची भयानक माहिती समोर आलीय. याप्रकरणी आरोपीविरुद्ध पॉस्को आणि अट्रोसिटी अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.या संदर्भात अक्षय प्रकाश खाडे, राजेश कोहळे, आकाश पिल्लारे आणि शिवाजी चौधरी या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटकही करण्यात आली आहे. यातील दोघांनी मुलीवर बलात्कारासह अनैसर्गिक अत्याचारही केले असल्याचं तक्रारीत म्हटलं आहे. त्यांना न्यायालयाने ९ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
समोर आलेल्या माहितीनुसार, मुलगी किराणा दुकानात निघालेली असताना शिवाजी चौधरीने तिला बोलवून घेतलं. त्याने तिला म्हटलं, की तुला तुझ्या आजीकडे सोडतो. यामुळे मुलगी त्याच्या दुचाकीवर बसली. मात्र, काही अंतर जाताच त्याने एका ठिकाणी गाडी थांबवत मुलीवर बलात्कार केला. तिने प्रतिकार केला असता तिच्या तोंडात आणि डोळ्यात रेती टाकली. इतकंच नाही तर चाकूने तिला जीवे मारण्याचाही प्रयत्न केला.