भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

बुलढाणा

धक्कादायक: नवजात शिशु जिवंत अवस्थेत आले आढळून; अवघ्या २४ तासांत जिल्ह्यात हा दुसरा प्रकार

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

मलकापूर, संकेत पवार : रमलकापूर मध्ये धक्कादायक प्रकार आज दि 29-8-2021 रोजी सकाळी 7.00 वाजेच्या सुमारास स्थानिक मलकापूर येथील धारिवाल अँड छोरीया पाण्याच्या टाकी जवळ नजीक एक नवजात शिशु हे जिवंत अवस्थेत आढळून आले.

सविस्तर वृत्त असे की सुरेश नामदेव उमाळे वय 48 हे नेहमी प्रमाणे मॉर्निंग वॉक साठी जात असता व आज सकाळी ते मॉर्निंग वॉक करता असता त्याना लहान बाळाचा रडण्याचा आवाज आला ते ऐकून सुरेश उमाळे हे भयभइत होऊन त्या नवजात शिशु कडे जाऊन बघतले तर ते जिवंत अवस्थेत आढळले या नवजात शिशु ला कोणी अज्ञात व्यक्ती ने रात्रीच्या सुमारास एका बांधलेल्या सिमेंट च्या चौकटीत टाकून दिल्याची माहित आहे पण ‘देव तारी त्याला कोण मारी’ नवजात शिशु हे जिवंत अवस्थेत आढळले या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली या घटनेची माहिती मिळताच पत्रकार बाळासाहेब जगताप, नारायण पानसरे, गणेश तायडे, स पो नि रतनसिंह बोराडे, पो.हे.काॅ.आनंद माने.गजानन ठोसर, विजयकुमार वर्मा, दिपक ईटनारे, मुन्ना पानसरे सह सर्व पत्रकार व पोलीस घटनास्थळी दाखल झाले व नवजात शिशु ला उपजिल्हा रुग्णालय येथे दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधिकारी यांनी शस्त्रक्रिया करून नवजात शिशु ला जिल्हा रुग्णालय बुलढाणा येथे हलविण्यात आले. पोलिसांनी पंचनामा करून अज्ञात व्यक्तीविरुद्ध भादवि कलम 317 दाखल करून पुढील तपास हे पी एस आय ठाकरे हे करत आहे

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!