तलाख तलाख तलाख ची धक्कादायक घटना, बॉस सोबत शारीरिक संबंध ठेवण्याची सक्ती
मुंबई, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l तलाख तलाख तलाख अशा तीन तलाखची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. हा प्रकार मुस्लिम महिलांच्या हक्कांविरुद्ध असून कायद्याचे उल्लंघन करणारा आहे.एका २८ वर्षीय महिलेवर तिच्या सॉफ्टवेअर इंजिनिअर पतीने १५ लाख रुपयांची मागणी करून, बॉससोबत शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडण्याचा प्रयत्न केला. नकार दिल्यावर पतीने तिला मारहाण करून तिला तलाख तलाख तलाख अशा तीन तलाक दिल्याची घटना उघडकीस आल्याने या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे.
कल्याण पश्चिम येथील सर्वोदय सृष्टीमध्ये राहणाऱ्या २८ वर्षीय विवाहितेने बाजारपेठ पोलीस ठाण्यात आपल्या पतीविरोधात तक्रार दाखल केली आहे. फिर्यादीच्या म्हणण्यानुसार, पती सोहेल हनिफउद्दीन शेख, वय ४५ वर्ष. याने पहिल्या पत्नीला १५ लाख रुपये द्यायचे असल्याने माहेरून पैसे आणण्यासाठी वारंवार दबाव टाकला.
पती सोहेल शेख याने त्याच्या पत्नीला ५ डिसेंबर रोजी बॉस सोबत संबंध ठेवण्याची सक्ती केली. त्यावर पत्नीने नकार दिल्यानंतर पतीने तिला शिवीगाळ करून मारहाण केली. तो एवढ्यावरच थांबला नाही तर हा आरोपी इतका निष्ठुर होता की त्याने पत्नीला तलाख तलाख तलाख असं तीन वेळा तलाक बोलून घराबाहेर हाकलून दिले. या प्रकरणी कल्याण येथील बाजारपेठ पोलिसांनी भारतीय दंड संहिता आणि मुस्लिम महिला (विवाह संरक्षण) कायदा २०१९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस पुढील तपास करीत आहेत. मात्र आरोपी पती सोहेल हनिफउद्दीन शेख, वय ४५ वर्ष. हा आरोपी अद्याप फरार आहे.