भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

आरोग्यक्राईममुक्ताईनगर

धक्कादायक : मुक्ताईनगर तालुक्यातील घोडसगाव -चिखली शिवार गांजा,नशेच्या गोळ्यांसह अनेक अवैध धंद्याचे माहेरघर?

मुक्ताईनगर,मंडे टु मंडे न्युज प्रतिनिधी | मुक्ताईनगर तालुक्यातील विदर्भाच्या सीमेवर असलेले चिखली- घोडसगाव पिंपरी-आकराऊत शिवारातील अनेक धाब्यावरती अवैध धंद्याचा मोठा सुळसुळाट दिसत असून हा शिवार जणू अवैध धंद्याचे माहेरघर बनू पाहत आहे? या शिवारातील अनेक धाब्यावरती अवैध वेश्या व्यवसाय, बायो डीजेल, गांजा, नशेच्या गोळ्या, केमिकल, कच्चे तेल, डिझेल- पेट्रोल, अशा अनेक अवैध व्यवसाय होत असल्यामुळे अवैध धंद्याचे माहेरघर म्हणून हा परिसर ओळखला जात आहे. आर्थिक लाभात जणू भावी पिढी बरबाद करण्याची व्यवस्था करण्यात आली असल्याचे दिसून येत आहे.

हा परिसर मुंबई नागपूर एशियन हायवे 46 वर असल्यामुळे येथून मोठ्या प्रमाणात ट्रकचालकांची वर्दळ असल्यामुळे अवैध व्यवसायाला वाव मिळत आहे?
मुक्ताईनगर पोलीस निरीक्षकांनी लक्ष देण्याची गरज
मुक्ताईनगर पोलीस स्टेशनच्या अंतर्गत हा परिसर येत असल्यामुळे पोलीस अधिकाऱ्यांना याबाबत माहिती आहे का? असल्यास येथे कारवाई का होत नाही? स्थानिक बीट हवलदार नेमके करतात तरी काय? याबाबत पोलीस निरीक्षकांनी लक्ष देण्याची गरज आहे……….!

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!