खळबळजनक : जळगाव हादरलं … कौटुंबिक वादातून सासरच्यांनी केली तरुणाची हत्या
जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | जळगाव शहरातील कालिका माता मंदिर परिसरात एका आकाश भावसार या ३० वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना शनिवार दि. ३ मे रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास घडली. ही हत्या तरुणाच्या सासरच्या मंडळीकडून करण्यात आल्याची माहिती मिळत असून या संदर्भात जळगाव येथील शनिपेठ पोलीस स्टेशनला खुनाचा गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.
आकाश पंडीत भावसार (सोनार, वय ३०, रा. अयोध्या नगर, जळगाव) हा आई, पत्नी, एक मुलगी, १ मुलगा अशा परिवारासह राहत असून तो ट्रान्सपोर्ट नगरामध्ये गाडी भरण्याचे एजंट म्हणून काम करून परिवाराचा उदरनिर्वाह करीत होता.
दरम्यान अनेक महिन्यांपासून आकाशची पत्नी व तीच्या परिवारासोबत कौटुंबिक वाद निर्माण होता. सातत्याने ती माहेरी येत जात असायची काही दिवसांपासून तो पत्नीला घेऊन वेगळा राहात होता. त्यामुळे त्यांच्या घरी नेहेमी कौटुंबिक वाद सुरू असायचा शनिवार ३ मे रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास आकाशच्या सासरच्या मंडळींनी हॉटेल ए वन जवळ आकाश सोनार याला गाठले. कौटुंबिक वादातून आकाशवर संशयित आरोपींनी धारदार शस्त्राने मांडीवर, छातीवर आणि गुप्तांगाला गंभीर वार करून जखमी केले.
तातडीने आकाश यास शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मयत घोषित केले. दरम्यान, रुग्णालयात उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत, शनिपेठ पोलीस स्टेशनचे निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्यासह पोलीस अधिकारी आणि कर्मचारी दाखल झाले आहेत. ४ संशयीत तरुणांची नावे समोर आली असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.