भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्र

तळीरामांना साठी धक्कादायक बातमी : थर्टीफस्टला दारू पिण्यासाठी शासनाचे नियमात बदल, काय आहेत नवीन नियम?

मुंबई, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l थर्टीफस्ट म्हणजेच ३१ डिसेंबर, नवं वर्ष सुरू होण्यासाठी अजून काही दिवस शिल्लक असताना मात्र अनेकांनी आतापासूनच नव वर्षाच्या स्वागताचं नियोजन करण्यास सुरुवात केलं आहे. नवं वर्षाच्या स्वागतासाठी अनेकांनी ३१ डिसेंबर ते १ जानेवारी या काळात पार्टीचं आयोजन केलं आहे. काही जण आपल्या कुटुंबासोबत आणि मित्रांसोबत घरीच नव्या वर्षाचं सेलिब्रेशन करणार आहेत. तर काही जण मात्र मस्त हॉटेलमध्ये जाऊन दारूचे ग्लास रिचवत नवं वर्षाचं सेलिब्रेशन करण्याच्या बेतात आहेत.

नव्या वर्षाचं सेलीब्रेशन करण्यासाठी अनेक जण हॉटेलात बार मध्ये दारू पिण्यासाठी येतात. ते प्रमाणाबाहेर भरपूर दारू पितात, हे भरपूर दारू पिऊन गडी चालवतात. त्या मुळे त्यांच्या सुरक्षतेचा प्रश्न निर्माण होतो. त्या साठी हा नियम बनवण्यात आल्याचं सांगण्यात आलं.

मात्र ज्यांना नव्या वर्षाच्या स्वागताला हॉटेल आणि बार मध्ये जाऊन नव्या वर्षाचं सेलिब्रेशन करायचं आहे, त्यांच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. नव्या वर्षाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रामध्ये काही नियमांत बदल करण्यात आले आहेत.
शासनाच्या नव्या नियमांनुसार नव्या वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी जे हॉटेल किंवा बारमध्ये ३१ डिसेंबरला जाणार आहेत, अशा मद्यपींना केवळ “चार पॅक” एवढीच दारू मिळणार आहे. चार पॅकपेक्षा अधिक दारू यावेळी कुठल्याही हॉटेलमध्ये मिळणार नाहीये. याबाबत हॉटेल असोसिएशनकडून माहिती देण्यात आली आहे.

तसेच कोणत्याही ग्राहकाला दारू देण्यापूर्वी त्याच्या वयाबाबत खात्री करून घ्यावी, त्याच्या वयाचा पुरावा त्याच्याकडे मागावा. अल्पवयीन असेल तर दारू देऊ नये. तसेच दारू पिल्यामुळे जर त्याला घरी जाण्यास समस्या असेल तर अशा व्यक्तींसाठी चालकाची सोय करावी. अशा नवीन गाईडलाईन हॉटेल व बार साठी देण्यात आलेल्या आहेत.

नव्या वर्षाच्या स्वागतासाठी ३१ डिसेंबरला सकाळी पाच वाजेपर्यंत सर्व हॉटेल आणि बार सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र त्यासोबतच हॉटेलमध्ये येणाऱ्या ग्राहकांना दारूच्या लिमीटचं बंधन देखील घालण्यात आलं आहे. मात्र आता हे नवीन नियम हॉटेल व बार मालकांसोबत दारू पिणारे तळीराम कितपत पाळतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!