भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

रावेर

धक्कादायक : दोन महिन्यांच्या बाळावर भटक्या कुत्र्यांचा हल्ला, झोळीतून ओढून नेत गंभीर जखमी झाल्याने बळाचा मृत्यू

रावेर तालुक्यातील घटना

कुंभारखेडा, ता. रावेर. मंडे टु मंडे न्युज. योगेश कोष्टी l रावेर तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली. आज ७ मार्च शुक्रवार रोजी सकाळी शेतात काम करीत असलेल्या मजुराच्या २ महिन्याच्या बाळाला झाडाला बांधलेल्या झोळीतून ओढून नेत भटक्या कुत्र्यांनी गंभीर चावे घेतल्याने त्यात बाळ गंभीर जखमी झाल्याने त्यात बाळाचा मृत्यू झाला. कुत्र्यांच्या हल्ल्यात बाळ मृत्युमुखी पडल्याने रावेर तालुक्यासह जिल्ह्यात खळबळ उडाली आहे

गेल्या काही महिन्यांपासून रावेर तालुक्यातील कुंभारखेडा येथील राजू गुप्ता यांच्या शेतात अनिल सालम भिलाला (वय ३१, रा. चौपाली पोस्ट हिलापाडावा ता. झिरण्या जि. खरगोन, सध्या रा. कुंभारखेडा ता. रावेर) हे आपल्या परिवारासह शेतमजुरी करण्यासाठी आलेले आहेत.
त्यांना १ मुलगा श्याम आणि २ मुली आशिया (वय ५) आणि दिव्या (वय २ महिने) अशी तीन मुले आहेत.

आज दि. ७ मार्च शुक्रवार रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास अनिल भिलाला आणि त्यांची पत्नी मीना शेतात काम करण्यासाठी गेले होते. त्या ठिकाणी शेतमालक आणि गावातील काही मजूर काम करीत होते. तेथे २ महिन्यांची मुलगी दिव्या हिला झोप लागत असल्याने तिला झाडाला झोका बांधून झोक्यामध्ये झोपवलेले होते. त्यावेळी दिव्याची आई- वडील आणि इतर मजूर शेतात काम करत होते. अचानक त्यांना चार ते पाच कुत्रे पळत असताना दिसले. सुरुवातीला त्यांना, कुत्रे जेवणाच्या डब्याकडे जात आहे असे वाटले. त्यावेळेला अनिल भिलाला हे कुत्र्यांच्या मागे पळाले. तेव्हा त्यांना लक्षात आले की, झोक्यात झोपवलेल्या बाळाला कुत्रे ओढून नेत होते. तेव्हा त्यांनी बाळाला कुत्र्यांच्या तावडीतून सोडविले.

मात्र दिव्याला कुत्र्यांनी चावा घेतल्यामुळे तिला शरीरावरती खूप जखमा झाल्या होत्या.त्या मुळे दिव्याला लागलीच रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिची तब्बेत जास्तच बिघडत असल्याने डॉक्टरांनी तिला जळगाव येथे शासकीय रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिला. मात्र दोन वर्षांच्या दिव्याला जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आणले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिव्याला तपासून मयत घोषित केले.

कुत्र्यांनी दिव्या भिलाला हिच्या डोक्याला, हाताला, पायाला, पोटाला जबर चावे घेतले होते. त्यामुळे गंभीर जखमी होऊन दिव्या हीचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती डॉक्टरांनी दिली आहे. या प्रकरणी पोलिस स्टेशनला घटनेची नोंद घेण्याचे काम सुरू होते.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!