संतापजनक : जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापकाचे धक्कादायक कृत्य, चक्क १४ विद्यार्थिनींसोबत केली शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी घटना
मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l एक राज्याला हादरविणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. ज्यांच्या विश्वासावर मुलींना शाळेत शिक्षण घेण्यासाठी पाठविले जाते तेच शिक्षक आता भक्षक बनल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे शालेय विद्यार्थींच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
शिक्षकी पेशाला काळिमा फासणारे कृत्य शाळेच्या मुख्याध्यापकाने केले आहे. एका जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापकाने त्याच्याच शाळेत शिकणा-या १४ विद्यार्थिनींचा विनयभंग केला आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. पिडीत मुलींचे पालक संतप्त झाले आहेत. महाराष्ट्राला हादरवाणारी ही घटना मराठवाड्यातील लातूर मध्ये घडली.
लातूर शहरातील MIDC पोलीस स्टेशनला या प्रकरणी पोलिसांनी मुख्याध्यापका विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पिडीत विद्यार्थीनींनी आपल्या पालकांकडे या घटनेसंदर्भात याची तक्रार केल्याने पालकांनी शाळेतील शिक्षकांकडे याबाबत विचारणा करण्यात आली. तसेच गट शिक्षण अधिकाऱ्यांकडे याची तक्रार करण्यात आली. या निंदनीय घटनेची गंभीर दखल घेत शाळेत विशाखा समिती स्थापन करण्यात आली. या समितीमार्फत पिडीत विद्यार्थीनींच्या तक्रारीची चौकशी करण्यात आली. चौकशीदरम्यान शाळेच्या मुख्याध्यापकानेच विद्यार्थिनींचा विनयभंग केल्याचे उघडकीस आल्याने मुख्याध्यापकाविरोधात लातूर एम आय डी सी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. तसेच या शिक्षकावर तात्काळ निलंबनाची कारवाई देखील करण्यात आली आहे.