धक्कादायक : पत्नीनेच केली अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या अपंग पतीची हत्या
जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l जळगाव जिल्ह्यातून एक धक्कादायक तेव्हढीच खळबळजनक घटना समोर आली आहे. धरणगाव तालुक्यातील अपंग असलेल्या अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या पतीला विहिरीत ढकलून खून केल्याचा धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रकाश यादव सुर्यवंशी (धोबी)(वय ३६ वर्ष रा.भवरखेडा ता. धरणगाव) हा अपंग तरुण आपल्या पत्नी ज्योती प्रकाश सुर्यवंशी हिच्या सोबत वास्तव्याला असून २ जून रोजी दुपारी १ ते ३ वाजेच्या दरम्यान, संशयित आरोपी पत्नी ज्योती प्रकाश सुर्यवंशी हिने पती प्रकाश सुर्यवंशी यांना तिच्या मार्गातील अडथळा दुर करण्याच्या उद्देशाने पतीला सोबत घेऊन गोविंदा शालिक पाटील यांच्या शेतातील मुंजोबाचे मंदिरात पाया पडण्याच्या बहाण्याने शेतात घेऊन गेली. तेथे परत त्यांचे वाद झाले. त्यानंतर पत्नीने पती प्रकाश धोबी यांना विहिरीत ढकलून देत हत्या केली. काही अंतरावरून प्रकाश सुर्यवंशी – धोबी यांचे काका अर्जुन धोबी याने हि घटना पाहिली. मात्र बदनामीच्या भीतीने त्यांनी कोणाला सांगितले नाही.
दरम्यान, पत्नी ज्योती हिचे माहेरी येथे गावातील एकाशी अनैतिक संबंध असल्याची माहिती प्रकाश याला होती. पत्नी ज्योतीसोबत त्यांचे अनेकदा शाब्दिक वाद होत होते. दरम्यान हा धक्कादायक प्रकार १२ जून बुधवार रोजी रात्री नऊ वाजता समोर आला.दरम्यान, प्रकाश यादव सुर्यवंशी. (धोबी) वय ३६ वर्ष रा.भवरखेडा ता. धरणगाव. याच्या खुनाची कबुली पत्नी ज्योती प्रकाश सुर्यवंशी(धोबी) हिने पोलिसांना दिली आहे.त्यानुसार पत्नी आरोपी ज्योती सुर्यवंशीच्या विरोधात धरणगाव पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक उद्धव ढमाले हे करीत आहेत.