धक्कादायक : वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून जळगाव येथील कृषी सहाय्यकाची कार्यालयातच व्हिडिओ रेकॉर्डिंग करत गळफास घेऊन आत्महत्या
जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l कृषी सहाय्यक असलेल्या कर्मचाऱ्याने वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून कार्यालयातच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुका कृषी अधिकारी कार्यालयात घडली. हा कर्मचारी जळगाव येथील रहिवाशी असून त्याने व्हिडिओ रेकॉर्डिंग करत आत्महत्या केल्याने कृषी विभागात मोठी खळबळ उडाली आहे.या संदर्भात तालुका कृषी अधिकारी ज्ञानेश्वर बरधे व कृषी सहाय्यक किशोर बोराडे या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगाव मधील जैनाबाद येथील रहिवाशी असलेल्या योगेश शिवराम सोनवणे वय ४० वर्ष. हे संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड येथील तालुका कृषी अधिकारी कार्यालयात सहाय्यक कृषी अधिकारी म्हणून कार्यरत होते. योगेश सोनवणे हे नेहमी प्रमाणे कार्यालयात गेले होते. मात्र अन्य कोणी कर्मचारी कार्यालयात नसताना त्यांनी आत्महत्या केल्याचे सांगण्यात आले. गळफास घेण्यापूर्वी त्यांनी मोबाईल मध्ये व्हिडिओ रेकॉर्डिंग करत का आत्महत्या करीत आहे. हे सांगितले.
योगेश सोनवणे याने आत्महत्या करण्यापूर्वी व्हिडिओ मध्ये कार्यालयात अधिकाऱ्यांचा होणारा त्रास आणि आत्महत्येस प्रवृत्त करणारांची नावे स्पष्ट केली असून तालुका कृषी अधिकारी व सहाय्यक कृषी अधिकारी हे मानसिक त्रास देऊन अपमानास्पद वागणूक देत असत तसेच कामाच्या व्यतिरिक्त सुटीच्या दिवशीही नेहमीच अतिरिक्त कामे सांगून करून घेत होते. त्यांच्या जाचाला व त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचे फिर्याद मध्ये नमूद केले आहे.
दरम्यान या घटने प्रकरणी पोलिसाना माहिती देण्यात आली असता पोलिस घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला. या संदर्भात मयत योगेश सोनवणे यांच्या पत्नी विमल सोनवणे यांच्या फिर्यादी नुसार सिल्लोड तालुका कृषी अधिकारी ज्ञानेश्वर बरधे व कृषी सहाय्यक किशोर बोराडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस करीत आहेत.
सिल्लोड उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. रात्री उशिरा जैनाबाद, जळगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. योगेश सोनवणे याच्या पश्चात आई, वडील, पत्नी व एक मुलगी असा परिवार आहे.
घटनेपूर्वी सकाळी ८.१५ वा. योगेश सोनवणे यांनी वरिष्ठांकडून कार्यालयाची चावी आणली. त्यानंतर शिपाई पठाण यांना फोन करून “कुठे आहात?’ विचारले. “तुम्ही लवकर येऊ नका’ असेही सांगितले. त्यानंतर शिपाई ९.१५ वाजता आले. दरवाजा उघडला असता सोनवणे गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसले.
बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा