धक्कादायक : लग्नाचे आमिष दाखवत केलेल्या लैंगिक अत्याचारातून तरुणी गर्भवती
रावेर तालुक्यातील घटना
रावेर, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l जिल्ह्यात लैंगिक अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत असताना जळगाव जिल्ह्यातून आणखी एक धक्कादायक घटना रावेर तालुक्यातून समोर आली आहे. लग्नाचे आमिष दाखवत तरूणीवर लैंगिक अत्याचार करून गर्भवती केल्याचा धक्कादायक प्रकार रावेर तालुक्यात उघडकीला आला असून निंभोरा पोलीस स्टेशनला या संदर्भात अजय बळीराम साळवे, रा. गाते ता. रावेर. यांचे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भातअधिक माहिती अशी की, रावेर तालुक्यातील एका गावातील २० वर्षीय तरूणीला अजय बळीराम साळवे रा. गाते ता. रावेर. याने लग्नाचे आमिष दाखवत नोव्हेंबर २०२१ ते डिसेंबर २०२४ च्या कालावधीत वेळोवळी अत्याचार केला. या अत्याचारातून पिडीत तरूणी ही गर्भवती राहली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने पिडीत तरुणीने निंभोरा पोलीस स्टेशनला तक्रार दिल्याने आरोपी अजय बळीरा साळवे , रा.गीते ता.रावेर याच्या विरोधात ५ फेब्रुवारी बुधवार रोजी संध्याकाळी गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास निंभोरा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीदास बोचरे हे करीत आहे.
