राज्य उत्पादन शुल्क विभागाची अशीही बनवाबनवी? काय आहे प्रकरण?
सावदा, ता. रावेर. मंडे टू मंडे न्युज नेटवर्क l महिलांच्या अवैध दारू विक्री विरोधात जनआक्रोष मोर्चाच्या तक्रारी नंतर राज्य उत्पादन शुल्क विभाग भुसावळ चे अधिकारी यांनी तासखेडा गावाची तक्रार होती म्हणून फक्त तासखेडा गावातच दारू अड्ड्यावर छापा टाकला यात दोन दारू अड्ड्यावर तब्बल ६५ लिटर दारू सापडल्याचे सांगितले.
परंतु महत्वाचे असे की, रोज ताजी दारू लागत असल्याने प्रत्येक दारू विक्रेता फक्त १० ते १५ लिटर दारू विक्रीसाठी उपलब्ध ठेवतो, मग दोन विक्रेत्यांची जास्तीत जास्त २५ ते ३० लिटर दारू पकडली जायला हवी, मग ही ६५ लिटर दारू आली कुठून? मिळालेल्या माहितीनुसार दोन्ही अवैध दारू विक्रेत्यांजवळ प्रत्येकी आठ ते बारा लिटर पर्यंत दारू होती. आणि त्यातही पकडलेली दारू नष्ट करून टाकली. मग नक्की ६५ लिटर दारू पकडली काय? २५ लिटर दारू पकडली की ६५ लिटर, रेकॉर्ड तयार करणारे तर आम्हीच आहोत? काही तरी करून दाखविले, या शाबासकी मिळविण्यासाठी तर हा ६५ लिटर दारू पकडल्याचा बनाव तर नव्हे? यात फक्त गावठी दारूच पकडली गेली, देशी विदेशी दारूच काय ?…..
भाग – ३