Video| श्रध्दा वालकर हत्येचा आरोपीस फाशीची शिक्षा; लव जिहाद कायदा व्हावा– रावेर यावल तालुक्यातील हिंदूंची निवेदनाद्वारे मागणी
फैजपूर – मंडे टू मंडे न्यूज प्रतिनिधी | श्रद्धा वालकर हत्या प्रकणातील क्रूर करमा आपताबला प्रकरण जलदगती न्यायालयात चालवून आरोपीस फाशीची शिक्षा देण्यात यावी महाराष्ट्रातही लव्ह जिहादविरोधी कायदा व्हावा अशी मागणी रावेर यावल सकल हिंदू समाजातर्फे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, लव्ह जिहादच्या जाळयात अडकून आज पर्यंत अनेक तरूणींची फसवणूक झाली आणि हत्या सुध्दा झाली आहे. श्रध्दा हिच्या मारेकरी आफताब व त्याच्या परिवाराला या गुन्हयाची कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे. श्रद्धा वालकर हिची हत्या करणा-या नराधम जीहादयाला भर चौकात फाशी दयावी आणि त्याच्या परिवाराला आणि त्याला सहकार्य करणा-याना सुध्दा आरोपी करावे. कोणत्याही परिस्थितीत आफताब पूनावाला या जेहाद्याला व त्याच्या परिवाराला या गुन्हयाची कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे, कायदा व सुव्यवस्थेकडून मागण्या करण्यात येत आहे. उत्तर प्रदेश राज्याप्रमाणे महाराष्ट्र राज्यात सुध्दा लव जिहाद कायदा करण्यात यावा.
घटनेच्या तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून करण्यात यावा. जलदगती न्यायालयासमोर चालवून तात्काळ आरोपीस फाशीची शिक्षा दयाची. फॉरेन्सिक लॅब तज्ञांची नियुक्ती या प्रकरणाच्या तपासासाठी करावी.आरोपीस कायदयातील कलम ३०२ प्रमाणे मनुष्यवधाचा गुन्हा व कलम २०१ प्रमाणे पुरावे नष्ट करण्याचा गुन्हा दाखल करून फाशीची शिक्षा दयावी. अशा जिहादी घटना समाजात वारंवार घडत आहेत आणि त्या घडू नयेत यासाठी असे जिहादी प्रकरण समाजाच्या निदर्शनास आल्यास त्यातील संभाव्य बळी पडणा-या मुलींना समुपदेशन करण्यास आम्हांस परवानगी घ्यावी अशी मागणी फैजपूर विभागाचे प्रांत अधिकारी कैलास कडलग यांना रावेर यावल तालुक्यातही हिंदू समाज बांधव व भगिनींनी दिलेल्या निवेदनात करण्यात आली.
यावेळी डॉ प्रियदर्शनी सरोदे, सावदा माजी नगराध्यक्ष अनिता येवले, सावदा भाजपाचे शहरध्यक्ष जितेंद्र भारंबे (जे.के), फैजपूर भाजपा शहराध्यक्ष अनंता नेहते, नगरसेविका सौ. रंजना भारंबे, सौ.लिना चौधरी, युवा मोर्चा तालुका उपाध्यक्ष प्रतिक भारंबे, भाजपा सरचिटणीस महेश अकोले, संतोष परदेशी, संजय सराफ, पराग पाटील, बजरंग दल जिल्हा संयोजक प्रतीक भिडे, अॅड. कालिदास ठाकूर, माजी नगराध्यक्ष राजेंद्र चौधरी, अनिरुद्ध सरोदे, डॉ. शेखर पाटील, संदीप कासार, सचिन बऱ्हाटे, सर्वेश लोमटे, प्रभुदास महाजन, दीपक पाटील, हर्षल महाजन, राहुल भोई, वैभव तेली, संदीप भारंबे, सपन परदेशी, पवन भोरट्टके, ॲड. धनंजय चौधरी, सुनील जोगी, देवेंद्र जोशी, अभय वारके, अनुराधा परदेशी, भारती पाटील, दिपाली झोपे, महेश बेदरकर, भरत भंगाळे, अतुल चौधरी यासह सर्व सहया करणारे सकल हिंदू संघटना व समाज रावेर व यावल तालुक्यातील समाज बांधव व भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.