भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

रावेरशैक्षणिक

श्री आ. गं. हायस्कूल व ना. वि. ह.पाटील विद्यालयाचे शालांत माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेत घवघवीत यश

सावदा, ता.रावेर,.मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l येथील श्री आ. गं. हायस्कूल व नाना साहेब विष्णू हरी पाटील विद्यालयाचा ची शालांत माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेत घवघवीत यश मिळविले आहे.

श्री आ. गं. हायस्कूल सावदा.
श्री आ. गं. हायस्कूल चा शालांत माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा मार्च २०२४ मध्ये घेतलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल आज दि. २७ मे २०१९ रोजी दुपारी २ वा. ऑनलाईन पद्धतीने जाहीर झाला. यात वाणी प्रद्युम्न हरीश याने ४४३ गुण मिळवून ८८.६०% प्रथम क्रमांक मिळविला. तर तायडे अमितोदन आत्माराम याने ४४० गुण मिळवून ८८.००% द्वितीय क्रमांक पटकावला. शाळेचा एकूण ७२ विद्यार्थ्यांपैकी ६२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून ८९.८५% निकाल लागला. सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे मुख्याधिकारी भूषण वर्मा, मुख्यध्यापक सी.सी. सपकाळे, पर्यवेक्षक जे.व्ही. तायडे व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.

सावदा येथील नानासाहेब विष्णू हरी पाटील विद्यालय ….
प्राची बऱ्हाटे प्रथम तर वृषाली राणे आणि कोमल भंगाळे अनुक्रमे द्वितीय आणि तृतीय

संपूर्ण १० वी च्या विद्यार्थ्यांची उत्सुकता असलेला महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत बोर्डाचा इयत्ता १० वी चा निकाल काल ऑनलाईन पद्धतीने जाहीर करण्यात आला. त्यामध्ये सावदा येथील श्री नानासाहेब विष्णू हरी पाटील विद्यालयाचा एकूण ९२.३० टक्के निकाल लागला.
विद्यालयातून कु . प्राची दत्तात्रय बऱ्हाटे ही विद्यार्थिनी ९०.२०% गुण मिळवून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाली तर अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक कु. राणे वृषाली संदीप ८९.४०%, कू. भंगाळे कोमल नीळकंठ ८७.६०% या विद्यार्थिनींनी पटकाविला. विद्यार्थिनींनी मिळविलेल्या यशाबद्दल शाळेच्या मुख्याध्यापिका पुष्पलता ठोंबरे, पर्यवेक्षक पी जी भालेराव, नगरपालिका मुख्याधिकारी भूषण वर्मा, शाळेचे शिक्षक शिक्षिका यांनी कौतुक केले आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!