सावदा येथे श्रीराम जन्मोत्सव निमित्त श्रीराम पालखी सोहळा व महाप्रसाद
सावदा, ता. रावेर. मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | सावदा शहरातील सुमारे २५० वर्षापूर्वीच्या श्री सुंदर राम मंदिर येथे दरवर्षीप्रमाणे यावर्षीही राम नवमी मोठ्या उत्साहात साजरी करण्याचे आयोजन करण्यात आले असून त्या निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
रविवार दिनांक ६ एप्रिल २०२५ या रामनवमी च्या दिवशी सकाळी ५:३० वाजता अभिषेक, सकाळी ९:३० ते १२:३० दरम्यान श्रीराम जन्मोत्सव पूजन, आरती व भजन आणि संजय महाराज कुलकर्णी जळगावकर यांचे श्रीराम जन्मोत्सवाचे कीर्तन, सोबत हार्मोनियम वादक अरुण सुगंधीवाले व तबला वादक नरेंद्र भावे असणार असून दुपारी १२ वाजेला श्री राम जन्मोत्सव , संध्याकाळी ६ ते ९ वाजे दरम्यान श्री सुंदर राम मंदिर येथून भव्य श्रीराम पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
तसेच दुसऱ्या दिवशी दि. ७ एप्रिल रोजी ८ पोत्यांचा भंडारा ( महाप्रसाद ) चे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमाला शहरातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सहभाग नोंदवावा असे आवाहन श्री सुंदर राम मंदिराचे विश्वस्त मोहन नम्र यांनी केले आहे.