जळगावशैक्षणिकसामाजिक

शेठ ला.ना.सा.विद्यालयात श्री. समर्थ रामदास नवमी मोठ्या उत्साहात साजरी

जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l जळगांव येथील शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शेठ ला.ना.सा.विद्यालयात शनिवार दिनांक 22 फेब्रुवारी रोजी सकाळी 7 ते 9 दरम्यान श्री.समर्थ रामदास नवमीचा कार्यक्रम मोठ्या भक्तिभावाने साजरा करण्यात आला.या कार्यक्रमाच्या सुरुवातीस ज्येष्ठ पर्यवेक्षक संजय वानखेडे सर, जेष्ठ शिक्षिका सौ. आशा कुलकर्णी मॅडम, सौ. मोहिनी कुलकर्णी मॅडम, ज्येष्ठ शिक्षक जगदीश साळुंखेसर, सोमनाथ महाजन सर यांच्या हस्ते विद्येची देवता सरस्वती माता व श्री समर्थ रामदास स्वामी यांच्या प्रतिमेस मा ल्ल्यारपण करण्यात आले.

या प्रसंगी शाळेतील ज्येष्ठ शिक्षिका सौ.प्राजक्ता गोहिल मॅडम व सौ.संगीता पानट मॅडम यांनी समर्थ रामदास लिखित श्लोकांचे पठण व अर्थ विवेचन विद्यार्थ्यांकडून करून घेतले.तसेच सौ. आशा कुलकर्णी मॅडम व सौ.मोहिनी कुलकर्णी मॅडम यांनी श्री.समर्थ रामदास स्वामी यांच्या आध्यात्मिक कार्याची माहिती सांगून विद्यार्थांनी सदाचाराने वागण्याचे आवाहन केले.जेष्ठ शिक्षिका सौ.अमला पिंपळे मॅडम व सौ.पद्मजा जोशी मॅडम यांनी विद्यार्थ्यांकडून श्री.रामरक्षा स्तोत्राचे पठण करून घेतले.

या प्रसंगी जेष्ठ शिक्षिका सौ.मंगला भारुळे मॅडम यांनी सुंदर प्रार्थना सादर केली. जेष्ठ पर्यवेक्षक तथा कार्यक्रम अध्यक्ष संजय वानखेडे सर यांनी मनाच्या श्लोकातील वचनाप्रमाणे विद्यार्थांनी वर्तणूक करण्याचे व चांगला नागरिक होऊन देशसेवा करण्याचे आवाहन केले.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक सचिन देशपांडे सर,उपमुख्याध्यापक संजय भारुळे सर, पर्यवेक्षक प्रशांत जगताप सर, संजय वानखेडे सर, सोमनाथ महाजन सर, जगदीश साळुंखे सर, उमेश ढाकणे सर, बापू सोनगीरे , किशोर माळी आदींनी परिश्रम घेतले.या कार्यक्रमाचे सूत्र संचालन सौ.रोहिणी प्रचंड मॅडम यांनी तर आभार प्रदर्शन सौ.पद्मजा जोशी यांनी केले.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!