भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्रसामाजिक

श्री संत मुक्ताई पालखी सोहळा श्रीक्षेत्र पंढरपूरात दाखल,मुक्ताई पादुका चंद्रभागा स्नानावेळी वरुण राजाने हजेरी लावून आईसाहेब मुक्ताईंचे केले स्वागत

पंढरपूर, मंडे टु मंडे न्युज नेटवर्कl श्री संत मुक्ताबाई पालखी सोहळा भुवैकूंठ पंढरीत दुपारी ३ वाजता वारकरी मेळ्यासह दाखल होताच आईसाहेब मुक्ताई पादुकांना चंद्रभागा स्नान घालण्यात आले,विशेष म्हणजे आईसाहेब मुक्ताई पादुकांना स्नान घालण्यास सुरुवात करताच पाऊसाला सुरुवात झाली,भर पावसात चंद्रभागा स्नान झाले,म्हणजेच वरुण राजाने आपली हजेरी लावून आईसाहेब मुक्ताईंचे श्रीक्षेत्र पंढरपूरात स्वागत केले,वारकरी भाविकांनीही पहीले चंद्रभागा स्नान केले व चंद्रभागा आरती केली,यावेळी ॲड.रविंद्र भैय्यासाहेब पाटील,अध्यक्ष मुक्ताई संस्थान,ह.भ.प.रविंद्र महाराज हरणे,पालखी सोहळा प्रमुख, ह.भ.प.विठ्ठल दास नामदास महाराज, सम्राट पाटील,सर्व मुक्ताबाई फडावरील ११९ दिंडी चालक,वारकरी भाविक उपस्थित होते.

पंचक्रोशी पाप नसे
ऐसा देव तेथें वसे
चला चला पंढरपुरा
दीन अनाथांच्या माहेरा
चंद्रभागे करितां स्नान
होती कोटी कुळें पावन
एक जनार्दनीं भेटी
तुटे जन्ममरण गांठीं

संपूर्ण महाराष्ट्रातील मानाचे पालखी सोहळ्यातील पंढरपूरात प्रवेश करणारी पहीली पालखी
चंद्रभागा स्नान झाल्यानंतर पालखी सोहळा जुने दगडी पुलावरून भुवैकूठ पंढरपूर येथे मिरवणूकीने दत्त घाटावरील मुक्ताई मठात दाखल झाला,तेथे आईसाहेब मुक्ताईंच्या पालखीची आरती करण्यात आली व अशाप्रकारे आईसाहेब मुक्ताईंचा पालखी सोहळा दत्त घाटावरील मुक्ताई मठात श्रीक्षेत्र पंढरपूरात विसावला.
आषाढी पौर्णिममेपर्यंत पालखी सोहळ्याचा मुक्काम मुक्ताई मठ श्रीक्षेत्र पंढरपूर येथे असतो.
१६ जुलैला वाखरी येथे संत निवृत्तीनाथ,संत ज्ञानदेव,संत सोपान,संत मुक्ताई,संत एकनाथ, संत नामदेव, संत तुकाराम सकळ संतांचा पालखी भेट सोहळा होईल.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!