यावल तालुक्यातील विरोदा येथे श्रीमद् भागवत कथा हरिनाम संकेतन सप्ताहाची शोभायात्रेने सुरुवात
फैजपूर, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l यावल तालुक्यातील विरोदा येथील विठ्ठल मंदिर येथे श्रीमद् भागवत कथा व हरिनाम संगीत सप्ताह भव्य शोभायात्रेने मोठ्या धार्मिक जल्लोषात प्रारंभ झाला आहे सदर सप्ताह २ ते ९ फेब्रुवारी दरम्यान असून पर्यंत आहे. रावेर यावल तालुक्याचे आमदार अमोल जावळे व कथेचे यजमान पोलीस पाटील पुरुषोत्तम हिरामण पाटील यांचे हस्ते भागवत ग्रंथाचे विधिवत पूजन दीपप्रज्वलन करण्यात आले.
सप्ताह चे धार्मिक कार्यक्रम असे असतील काकडा आरती सकाळी ५ ते ६, विष्णू सहस्रणाम ७ ते ८, जपपूजन ९ ते १०, भागवत कथा २ते ५,हरिपाठ ५ते ६, कीर्तन सेवा रात्री ८ ते १०, दिनांक २ फेब्रुवारी ला हभप भानुदास महाराज भुसावळ, दुसरा दिवशी हभप कु रुजल वारके विरोदा, तिसरा दिवशी संजय महाराज बाम्हादा, चौथा दिवशी दुर्गेश तिवारी भजन संध्या उत्तर प्रदेश, पाचवा दिवशी हभप शालिग्राम महाराज चितोडा, सहव्या दिवशी हभप डॉ नरसिंह कदम संभाजी नगर,सातवा दिवशी हभप चैतन्य महाराज नाशिक, आठव्या दिवशी काल्याचे कीर्तन हभप किशोर महाराज भुसावळ सकाळी १० ते १२, मृणगाचार्य कुदन महाराज डो कठोरा, गायनाचार्य खुशाल महाराज भूषण महाराज, गणेश महाराज, भजनी मंडळ विरोदा, सन्मित्र वारकरी मंडळ कठोरा मुन्ना भाई ढोलक, माणिकचंद महाराज पंडित तिवारी यांचे सहकार्य लाभते आहे.