“तू पोलिस स्टेशनला तक्रार दिली तर” व्हिडीओ, कॉल रेकॉर्डींग व फोटो व्हायरल करण्याची धमकी देत विवाहितेवर लैंगिक अत्याचार
मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l २८ वर्षीय विवाहितेला तिचे व्हिडीओ, कॉल रेकॉर्डींग व फोटो व्हायरल करण्याची धमकी देवून तिला मित्राच्या रूम वर नेऊन तिच्यावर जबरी अत्याचार केला. तसेच शिवीगाळ करत जर तू पोलिस स्टेशनला तक्रार केली तर तुझ्या परिवाराला संपवून टाकेल अशी धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार चाळीसगाव शहरात उघडकीस आला.
या संदर्भात अधिक वृत्त असे की, आपल्या परिवारासह रहात असलेल्या चाळीसगाव शहरातील एका २८ वर्षीय विवाहितेचा तुषार उर्फ सागर बाबुराव बोरसे रा.चाळीसगाव याने विवाहितेला दुचाकीवर बसवून नेऊन मित्राच्या रूमवर लैंगिक अत्याचार केला. तसेच याबाबत कुणाला सांगितले किंवा पोलीसात तक्रार दिली तर परिवाराला जीवे ठार मारेल अशी धमकी दिली.
तसेच तुझे फोटो, व्हिडीओ आणि कॉल रेकॉर्डींग तिच्या पतीला पाठविण्याची धमकी दिली. दरम्यान या घडलेल्या प्रकाराबाबत विवाहिने चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली. त्या नुसार आरोपी तुषार उर्फ सागर बाबुराव बोरसे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास स. पो. निरीक्षक सागर कोते हे करीत आहेत.