भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्रराजकीय

“तुम्ही मला मुख्यमंत्री बनवलं नाही तर ….” संजय राऊत हे उद्धव ठाकरे यांना ब्लॅकमेल करीत होते.मोठा गौप्यस्फोट?

मुंबई, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l उद्धव ठाकरे याना संजय राऊत ब्लॅकमेल करीत होते असा मोठा गौप्यस्फोट नितेश राणेंनी केला आहे. उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री करण्याचा संजय राऊत यांचा विरोध होता. असाही आरोप राणेंनी केला आहे. उद्धव ठाकरेंच्या नावाला संजय राऊत यांचा मोठा विरोध होता. ज्याला कुठला अनुभव नाही ज्याला पक्ष चालवता येत नाही त्याला तुम्ही मुख्यमंत्री कसे करता हे तुम्ही शरद पवार यांना विचारले नव्हते का?, असा सवाल करत नितेश राणेंनी राऊतांवर निशाणा साधला.

नितेश राणेंनी राऊतांवर मोठमोठे आरोप केले..
तुम्ही मला मुख्यमंत्री बनवलं नाही तर मातोश्रीच्या आतल्या बातम्या बाहेर सांगेन, असं म्हणत संजय राऊत यांनी मातोश्रीत जाऊन उद्धव ठाकरे यांना ब्लॅकमेल करायला सुरुवात केली होती, असं गौप्यस्फोट नितेश राणे यांनी गेला. पुढे नितेश राणे असेही म्हणाले, तुम्ही बाळासाहेब ठाकरे यांची प्रॉपर्टी कशी हडप केली? याची कागद पत्रे बाहेर देईन अशी धमकी संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंना दिली असल्याचे नितेश राणे यांनी म्हटले.

तसेच संजय राऊत यांनी शरद पवारांना देखील जाऊन सांगितले होते की, माझे नाव मुख्यमंत्री म्हणून चालवा असा आग्रह धरला असल्याचा म्हणत नितेश राणे यांनी दावा केला. सामना कार्यालातून किती आमदारांना फोन झाले होते की तुम्ही संजय राऊतचे नाव मुख्यमंत्री म्हणून सुचवा, कुठले ब्लॅकमेलिंग आणि धमक्यांचे धंदे सुरू केले होते, असा हल्लाबोलही नितेश राणे यांनी केला.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!