भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमयावल

“मापात पाप” धान्य साठ्यात मोठी तफावत, ५ लाखांचा अपहार, यावल तालुक्यातील रेशन दुकानाचा परवाना रद्द

यावल, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | यावल तालुक्यातील एका स्वस्त धान्य दुकानाचा परवाना रद्द करण्यात आला आहे. लाभार्थ्यांना धान्य कमी वाटप करून ” मापात पाप ” केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. तपासणी दरम्यान जुलै २०२५ या महिन्यातील धान्याचे वाटप न केल्याने आणि धान्यसाठ्यात मोठी तफावत आढळून आल्यानंतर अनामत रक्कम जप्त करून जिल्हा पुरवठा अधिकारी महेश चौधरी यांनी दुकानाचा परवाना रद्द केला. तसेच धान्याच्या तफावती पोटी ५ लाख ११ हजर ७६४ रुपयांची अपहार झालेली  रक्कम व्याजासहित भरण्याचे आदेश देण्यात आले. या कारवाईने काळाबाजार करणाऱ्या रेशन दुकानदारांमध्ये मोठी खळबळ उडाली.

मिळालेली माहिती अशी की, यावल तालुक्यातील चुंचाळे येथील यो. बा. नेवे यांच्या स्वस्त धान्य दुकानास सावखेडे येथील वि.का. सोसायटीचे दुकान संलग्न करण्यात आले होते. मात्र, या दुकानातून लाभार्थ्यांना कमी प्रमाणात धान्य वाटप केल्याचे स्पष्ट झाले. जुलै २०२५ या महिन्यातील धान्याचे वाटप केले नसल्याचे तपासणीत आढळून आले होते. त्यामुळे धान्यसाठ्यात मोठी तफावत आढळून आली.
प्राधान्य कुटुंबातील लाभार्थ्यांच्या गव्हापोटी १ लाख ६६ हजार १४४ रुपये आणि तांदळापोटी ३ लाख ४५ हजार ६२० रुपयांची रकम वसुलीस पात्र ठरत असल्याचा निष्कर्ष जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी नोंदविला होता. त्यानंतर याप्रकरणी जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी सुनावणी घेतली. त्यानंतर कारवाईचे आदेश दि.१७ रोजी काढले. दरम्यान, नेवे यांच्या स्वस्त धान्य दुकानाचा परवाना रद्द करून १०० टक्के अनामत रक्कम जप्त करण्याचे आदेश जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी दिले आहेत.

तसेच सावखेडे सीम येथील दुकानातील धान्याच्या तफावती पोटी ५ लाख ११ हजर ७६४ रुपयांची रकम अपहार झाल्याच्या दिनांकापासून वसुली करेपर्यंत राष्ट्रीयीकृत बँकेच्या व्याजदराने वसुली करण्याचे आदेश दिले आहेत, तसेच नेवे यांचा परवाना रद्द झाल्याने चुंचाळे येथील दुकानातील लाभार्थ्यांना नायगाव येथील जितेंद्र बोरसे या परवानाधारकाला तात्पुरत्या स्वरूपात जोडण्याचे आदेश दिले आहेत.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!