ब्रेकिंग : चार हजारांची लाच स्वीकारताना सावदा वीज विभागाच्या सहा. अभियांत्यासह दोन लाईनमन एसीबीच्या जाळ्यात, वीज कंपनी विभागात खळबळ
फैजपूर, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l यातील तक्रारदार ३४ वर्षीय पुरुष असून हे हॉटेल व्यवसायिक आहेत. भुसावळ येथील त्यांच्या हॉटेलवर लावलेले जुने मीटर काढून नवीन मीटर लावून तक्रारदार यांनी जुन्या मीटरमध्ये फॉल्ट केला आहे असे भासवून तक्रारदार यांच्यावतीने सकारात्मक अहवाल पाठवण्याच्या मोबदल्यात सहाय्यक अभियंता कविता भरत सोनवणे, लाईनमन संतोष सुकदेव इंगळे, व वरिष्ठ तंत्रज्ञ कृणाल अनिल चौधरी. तिन्ही नेमणूक कक्ष कार्यालय म.रा.वि.वि कंपनी मर्या सावदा. नेमणूक पाडळसा , तालुका यावल, जिल्हा जळगाव यांनी तक्रारदार यांच्याकडे प्रथम २० हजार, व नंतर १५००० हजार रुपये लाचेची मागणी करून तडजोडीअंती चार हजार रुपये लाच रक्कम संतोष सुकदेव इंगळे यांनी स्वीकारली .सदरची कारवाई आज दि. १९ डिसेंबर गुरुवारी रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास पाडळसे, तालुका यावल येथे घडली. या घटनेने वीज वितरण विभागात मोठी खळबळ उडाली आहे.
या संदर्भात फैजपुर पोलीस स्टेशन येथे 1) कविता भरत सोनवणे,वय 42 वर्ष , व्यवसाय नोकरी , सहाय्यक अभियंता म.रा.वि.वि कंपनी मर्या सावदा ( वर्ग-2) रा, हुडको कॉलनी भुसावळ. 2) संतोष सुकदेव इंगळे ,वय 45 वर्ष नोकरी , लाईनमन म.रा.वि.वि कंपनी मर्या सावदा ( वर्ग-3) रा मल्हार कॉलनी फैजपुर. 3) कुणाल अनिल चौधरी, वय 39 वर्ष वरिष्ठ तंत्रज्ञ, ( म.रा.वि.वि कंपनी मर्या सावदा वर्ग-4) रा. अयोध्या नगर भुसावळ. तिन्ही आरोपींची नेमणूक कक्ष कार्यालय पाडळसा , तालुका यावल, जिल्हा जळगाव असून
यांचे विरोधात फैजपूर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे.
सदरची कारवाई योगेश ठाकूर, पोलीस उप अधीक्षक लाप्रवि जळगांव. सापळा अधिकारी व तपास अधिकारी श्रीमती नेत्रा जाधव. पोलीस निरीक्षक, ला प्र.वि जळगाव. PSI दिनेशसिंग पाटील. पोना किशोर महाजन
पो कॉ राकेश दुसाने यांनी केली.