शौचालयात घोटाळ्या प्रकारणात अजून सहा जणांना अटक !
रावेर, मंडे टू मंडे न्यूज वृत्तसेवा : रावेर पंचायत समितीतील वैयक्तीक शौचालयात घोटाळ्या प्रकारणात अजून सहा जणांना अटक करण्यात आली असून कारवाईमुळे रावेर तालुक्यात पुन्हा खळबळ उडाली आहे. आतापर्यंत संशयित आरोपीची संख्या १८ वर पोहचली आहे.
रावेर पंचायत समितीतील वैयक्तिक शौचालय भ्रष्टाचार प्रकरण चांगले गाजत असून काल २६ जुलै रेाजी रात्री रावेर पोलीसांनी पुन्हा ६ जणांना अटक करत करण्यात आली असून यापुवी १२ जणांना अटक करण्यात आली होती. यामध्ये रावेर तालुक्यातील राहुल जिवन सोनार (निंभोरा), प्रदीप वेडु धनगर (बलवाडी), अशोक हरी पाटील(सिंदखेड), राहुल मूरलीधर कोळी (पूरी), गोपाळ वेडु गुरव (बलवाडी), जितेंद्र मंगळु अडगावकर (गाते) यांना अटक करण्यात आली.
सदरील भ्रष्टाचार प्रकरणात लिपीकसह पंचायत समिती वर्तुळातील आतापर्यंत एकुण १८ जणांना अटक करण्यात आली आहे. अजूनही काही जण पोलीसांच्या रडावर असून याप्रकरणाने तालुक्यासह जिल्ह्यासह खळबळ उडाली आहे.