भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

मुक्ताईनगरशैक्षणिक

मुक्ताईनगर तालुका एज्युकेशन सोसायटीच्या श्रीमती गोदावरीताई गणपतराव खडसे महाविद्यालयास नॅकचे ब++ मानांकन प्रदान

मुक्ताईनगर, मंडे टु मंडे न्युज प्रतिनिधी l मुक्ताईनगर तालुका एज्युकेशन सोसायटी, मुक्ताईनगर संचलित श्रीमती गोदावरीबाई गणपतराव खडसे महाविद्यालयाच्या तिसऱ्या पुनर्मुल्यांकनासाठी नॅक पीअर टीमने दिनांक ११ आणि १२ फेब्रुवारी २०२५ रोजी भेट दिली होती. या मुल्यमापनामध्ये राष्ट्रीय मुल्यांकन आणि मान्यता परिषदने (नॅक) महाविद्यालयास २.९० सी.जी.पी.ए. सह ‘ ब++’ हे मानांकन प्रदान केले आहे. या यशाने महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.

महाविद्यालयाने पहिल्या फेरीत ब श्रेणी, दुसऱ्या फेरीत ब + श्रेणी आणि तिसऱ्या फेरीत ब++ श्रेणी प्राप्त करत शैक्षणिक क्षेत्रातील आपले धुरिणत्व पुन्हा एकदा सिद्ध केले. या यशाबद्दल मुक्ताईनगर तालुका एज्युकेशन सोसायटी मुक्ताईनगर संस्थेच्या, अध्यक्षा ॲड. सौ. रोहिणी खडसे खेवलकर, उपाध्यक्ष श्री. नारायण नामदेव चौधरी, सचिव डॉ. सी. एस. चौधरी व सर्व संचालक मंडळ यांनी प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी, माजी विद्यार्थी यांचे कौतुक केले आहे.

राष्ट्रीय मुल्यांकन आणि मान्यता परिषद (नॅक) ही देशभरातील उच्च शिक्षण प्रदान करणार्या शैक्षणिक संस्थाचे शास्त्रीय पद्धतीने शैक्षणिक परीक्षण, अध्ययन-अध्यापन प्रणाली, विस्तारकार्य, संशोधन, पायाभूत सुविधा, व्यवस्थापन आदी निकषांच्या आधारे मुल्यांकन करून त्यांना श्रेणी प्रदान करते. याच धर्तीवर मुक्ताईनगर तालुका एज्युकेशन सोसायटीचे श्रीमती गोदावरीबाई गणपतराव खडसे महाविद्यालयाच्या तिसऱ्या पुनर्मूल्यांकनाच्या फेरीसाठी नॅक पीअर टीमने भेट दिली होती.

महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. डॉ. एच. ए. महाजन यांनी प्राचार्यपदाचा पदभार स्वीकारल्यापासून नॅक पुनर्मूल्यांकनाचा विषय प्राधान्यक्रमाने हाती घेतला होता. या मूल्यांकनाच्या प्रक्रियेमध्ये अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ. ए. पी. पाटील, सह समन्वयक डॉ. सौ. व्हि.
व्हि. चौधरी यासोबतच कला, वाणिज्य व विज्ञान शाखांचे प्रमुख, सर्व विभाग आणि समित्यांचे प्रमुख, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, माजी विद्यार्थी व पालक यांनी महत्वपूर्ण भूमिका निभावली.

या शैक्षणिक मूल्यमापन भेटी दरम्यान नॅक पिअर टीमचे चेअरमन प्रो. डॉ. रमेश कुमार, माजी प्र. कुलगुरू, टी. एम. भागलपूर विद्यापीठ, बिहार, समन्वयक सदस्य म्हणून वीर बहादुर सिंह पूर्वांचल विद्यापीठ उत्तर प्रदेश, व्यवस्थापन विभागाचे प्रमुख प्रो. डॉ. अविनाश पाथर्डीकर, व सदस्य म्हणून पश्चिम बंगाल मधील कोलकाता येथील मानकर महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. डॉ. सुकांतो भ्रष्टाचार्य, यांनी महाविद्यालयातील विविध शैक्षणिक विभाग, ग्रंथालय, परीक्षा विभाग, विद्यार्थी परिषद व कल्याण कक्ष, महिला विकास कक्ष, बहिणाबाई स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, भाषा प्रयोगशाळा, मशरूम रोपण केंद्र, विस्तार विभाग- राष्ट्रीय सेवा योजना, जिमखाना, प्रशासकीय कार्यालय तथा महाविद्यालयातील पायाभूत सुविधांची पाहणी केली.

तदनंतरच्या समारोप बैठकीमध्ये नॅक पिअर टीमचे चेअरमन
टी. एम. भागलपूर विद्यापीठाचे माजी प्र. कुलगुरू प्रो. डॉ. रमेश कुमार, यांनी उपस्थितांना संबोधित करताना नॅक मूल्यांकनासाठी आवश्यक सर्व घटकांची नियोजनबद्धपूर्ण तयारी केल्याबद्दल महाविद्यालयाच्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्गाचे तसेच महाविद्यालयाच्या उत्कर्षामध्ये महत्त्वाची भूमिका निभावणारे अध्यक्षा ॲड. सौ. रोहिणी खडसे खेवलकर, उपाध्यक्ष, श्री. नारायण नामदेव चौधरी, सचिव डॉ. सी. एस. चौधरी व व संचालक मंडळ
यांच्याबाबत गौरव उद्गार काढले. त्यांच्या कार्यकाळातील भेट दिलेल्या ग्रामीण भागातील महाविद्यालयांपैकी मुक्ताईनगर तालुका एज्युकेशन सोसायटी संचलित श्रीमती गोदावरीबाई गणपतराव खडसे महाविद्यालय हे उत्कृष्ट महाविद्यालय असल्याचे प्रतिपादन केले.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!