…..तर दहावी बारावी च्या विद्यार्थ्यावर फौजदारी गुन्हा दाखल होणार…
मुंबई, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दरवर्षी इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षा घेण्यात येतात. या वर्षी दहावी आणि बारावीच्या परीक्षेपूर्वी विद्यार्थ्यांसाठी काही नियमावली जाहीर केली असून महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अध्यक्षांनी मोठा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कॉपी करून पास होणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा धक्का बसला आहे.
काही विद्यार्थी परीक्षेत कॉपी करून पास होतात. मंडळ परीक्षेतील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी वेगवेगळे फंडे वापरत आहेत. यंदा मात्र कॉपी बहाद्दरांना आळा बसणार आहे. कारण दहावी आणि बारावीच्या परिक्षा कॉपी मुक्त करण्याचा मंडळाचा प्रयत्न असून विशेष त्यासाठी कॉपी मुक्त अभियान राबवण्यात आले आहे.
विद्यार्थी आणि त्यांना कॉपी करण्यासाठी मदत करणाऱ्यांवर आता थेट फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिली आहे.
दहावी बारावी परीक्षा असलेल्या संवेदनशील केंद्रात अधिक पोलीस बंदोबस्त राहील, तालुका प्रशासनाने संपूर्ण तालुक्याचे विविध विभागातील अधिकारी यांची पथके करावीत व सर्व परीक्षा केंद्राना भेटी द्याव्यात,जिल्ह्यात कोणत्याही केंद्रात एकही कॉपी होणार नाही याची दक्षता घ्यावी,प्रत्येक परीक्षा केंद्रावर बारीक लक्ष ठेवा,रिपोर्ट करा. तात्काळ कृती करा, वैयक्तिक,सामुहिक कॉपी होणार नाही. झाल्यास कायदेशीर कारवाई तात्काळ करण्यात येईल. कॉपी झाल्यास वा केल्यास शाळांची मंडळ मान्यता व शाळा मान्यता कायम स्वरुपी रद्द करण्यात येईल. परीक्षा नियंत्रण कक्ष व वॉर प्रत्येक परीक्षा केंद्राचे लाईव्ह नियंत्रण ठेवतील, असे निर्देश देण्यात आले आहे.