भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्रराजकीय

…तर फडणवीसांनंतर राज्यात भाजपचा नवा चेहरा कोण असणार

मुंबई, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपला मोठा धक्का बसलाय. या नंतर आता चार महिन्यांनी विधानसभेच्या निवडणुकाही होणार आहेत. त्यामुळे महायुतीला आत्मचिंतन करावे लागणार आहे. भाजपला यंदा फक्त ९ जागा मिळाल्या आहेत. महाराष्ट्रातील भाजपचा चेहरा असलेले देवेंद्र फडणवीस यांनी लोकसभा निवडणुकीतील अपयशामुळे उपमुख्यमंत्रिपदाच्या सध्याच्या जबाबदारीचा राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त केली आहे. जर फडणवीस यांनी राजीनामा दिला आणि वरिष्ठांनी तो राजीनामा मंजूर केला तर एकंदरीत पाहता सध्या भाजपच्या राष्ट्रीय सरचिटणीसपदाची जबाबदारी सांभाळणारे विनोद तावडे यांना पक्षाचे केंद्रीय नेतृत्व महाराष्ट्राच्या राजकारणात परत आणू शकते.

आताच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले आहे. महायुतीकडून ४५ हून अधिक जागांचा निवडून आणण्याचा दावा करण्यात आला होता. परंतु प्रत्यक्षात त्यांना फक्त १७ जागा मिळाल्या आहेत. २३ जागा असलेल्या भाजपला या निवडणुकीत फक्त ९ जागा मिळाल्या आहेत. १४ जागांचा तोटा या निवडणुकीत भाजपला झाला आहे .राज्यात काही ठिकाणी मराठा आरक्षणाच्या आंदोलनामुळे नाराजीलाच सामोरे जावे लागलेय.

राज्यातील पंकजा मुंडे, केंद्रीय मंत्री भरती पवार,रावसाहेब दानवे,सुधीर मुनगंट्टीवार, सह अनेक विद्यमान खासदारांसह मोठ्या नेत्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. पंकजा मुंडे यांच्या जवळचे धनगर नेते महादेव जानकर यांचाही पराभवाचा धक्का बसला आहे. राज्यात भाजपला या गोष्टी हाताळण्यात अपयश आले.

अवघ्या चार महिन्यांवर महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका येऊन ठेपल्या आहेत. महाराष्ट्रातील भाजपचा चेहरा असलेले देवेंद्र फडणवीस यांनी लोकसभा निवडणुकीतील अपयशामुळे उपमुख्यमंत्रिपदाच्या सध्याच्या जबाबदारीचा राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त केली आहे. विधानसभा निवडणुकीच्या तयारीवर त्यांना पूर्ण लक्ष केंद्रित करायचे आहे. असं त्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, मराठा, ओबीसी, एससी आणि एसटी समाजाने पाठ फिरवल्याने भाजपला या निवडणुकीत मोठा धक्का बसला आहे. इतर मराठी भाषिक समाजही फडणवीस यांच्यावर नाराज होता. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेससारखे प्रादेशिक पक्ष फोडल्याचा आरोप त्यांच्यावर असल्याने अनेक लोकं नाराज होते. अशी अनेक कारणे आहेत ज्यामुळे त्यांना अनेक जागा गमवाव्या लागल्या. ज्या विदर्भातून देवेंद्र फडणवीस येतात, त्या नागपूरमध्ये भाजपला फक्त एक जागा जिंकता आली आहे. तेही नितीन गडकरींनी केलेल्या कामामुळे. काँग्रेसला येथे मोठं यश मिळालंय.राज्यात बऱ्याच ठिकाणी काँग्रेसला यश आले आहे. त्या मुळे काँग्रेसच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

विनोद तावडे केंद्राची पहिली म्हणून महाराष्ट्रात दमदार नेतृत्व हवं म्हणून राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या जागी कोणता चेहरा पुढे येऊ शकतो याची चर्चा सुरु झाली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपला नवा चेहरा हवा आहे. यामध्ये भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे हे केंद्राची पहिली पसंती असू शकतात. भाजपचे ज्येष्ठ नेते प्रमोद महाजन यांच्यानंतर राष्ट्रीय सरचिटणीस झालेले विनोद तावडे हे महाराष्ट्रातील पहिले नेते आहेत.

गेल्या काही वर्षांत विनोद तावडे यांना स्वतला सिद्ध केले आहे. त्यांच्याकडे बिहार आणि हरियाणाचे प्रभारी म्हणून जबाबदारी देण्यात आली होती. ती त्यांनी सिद्ध केली. आपली राजकीय परिपक्वता त्यांनी दाखवून दिली आहे. दिल्लीच्या राजकारणात आता विनोद तावडे यांना चांगला अनुभव मिळाला आहे. ते स्वतः मराठा समाजातून येतात. त्यामुळे महाराष्ट्र भाजपला सध्या सर्वाधिक गरज त्यांची भासत आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!