पाचोरासामाजिक

सामाजिक कार्यकर्ते अनिल सावंत सर यांना कोहिनुर राष्ट्रीय पुरस्कार जाहीर

पाचोरा, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | नाशिक येथील दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संस्था ( संघ ) यांच्याकडून दरवर्षी दिला जाणारा सामाजिक क्षेत्रातील तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल महत्वाचा कोहिनुर राष्ट्रीय पुरस्कार जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते  अनिल सावंत सर यांना जाहीर झाला असून सदरचा पुरस्कार हा विविध मान्यवरांच्या हस्ते नाशिक येथे विशाखा हॉल, कुसुमाग्रज प्रतिष्ठान,गंगापूर रोड,नाशिक येथे दिनांक ०४ मे २०२५ रोजी विविध मान्यवरांच्या हस्ते दिला जाणार आहे.


जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते  अनिल सावंत सर हे गेले अनेक दशकापासून चर्मकार समाजात उल्लेखनीय कार्य करत असतात ते आज विविध संघटनेत देखील काम करत असून त्यांचा सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, तसेच पत्रकारिता या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करीत असून त्यांना हा पुरस्कार मिळणे म्हणजेच एक मानाचा तुरा समाजात रोवला गेला असून ते आज विविध क्षेत्रातील सामाजिक तसेच शैक्षणिक क्षेत्रात मालन वसतिगृह पाचोरा येथे अधीक्षकपदावर , तसेच सहकार क्षेत्रात संचालक म्हणून दादासाहेब गजमल को-ऑप बँकेत अनेक वर्षे होते व पत्रकारिता मध्ये अनेक वृत्तपत्र मध्ये काम करून आजमितीला स्वतः झटपट लाईव्ह न्यूज च्या माध्यमातून संपादक म्हणून काम पाहतात ते गाळण बु ग्रामपंचायत मध्ये माजी सदस्य म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. त्यांच्या या निवडीबद्दल सर्वच राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, तसेच पत्रकार, व सहकार क्षेत्रातुन अभिनंदनाचा वर्षाव होत आहे

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!