रावेरसामाजिक

तांडा सुधार समिती स्थापन करण्याची रावेर गटविकास अधिकाऱ्यांकडे मागणी

पाल, ता. रावेर. मंडे टु मंडे न्युज प्रतिनिधी l रावेर तालुक्यात संत सेवालाल महाराज बंजारा लमाण समाज. तांडा सुधार समिती स्थापन करण्याची मागणी रावेर गट विकास अधिकाऱ्यांकडे समजा कडून करण्यात आली.

गटविकास अधिकारी खेमचंद वानखेडे याना भेटून संत सेवालाल महाराज बंजारा लमाण समाज. तांडा समृध्दी योजनेबाबात चर्चा करून तालुका तांडा सुधार समिती स्थापन करण्याबाबत पत्र दिले. लवकरात लवकर समिती स्थापन करावी जेणे करून या योजनेची लवकर अंमलबजावणी करण्यात येईल. यावेळी समिती सदस्य देवसिंग पवार, सुरेश पवार संतोष राठोड, रुग्ण कल्याण समिती चे दीपक नगरे, सहाय्यक गट विकास अधिकारी फेगडे उपस्थित होते

या वेळी या योजनेच्या माध्यमातून बंजारा समाजाचे अनेक प्रश्न सुटतील व तांड्याचा विकास होईल या साठी सर्वांनी सहकार्य करा अशी अपेक्षा गटविकास अधिकारी यांनी व्यक्त केली.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!