भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

प्रशासनमहाराष्ट्रराजकीय

राज्यात विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, 20 नोव्हेंबरला मतदान तर 23 नोव्हेंबरला निकाल

मुंबई, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा केली आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्र आणि झारखंड या राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची आज घोषणा करण्यात आली आहे.निवडणूक आयोगाची आज पत्रकार परिषद पार पडली, या पत्रकार परिषदेत निवडणूक आयोगाने संपूर्ण निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. त्यामुळे आजच विधानसभा निवडणुकीचे बिगूल वाजलं आहे.

महाराष्ट्राच्या विधानसभेची मुदत येत्या 26 नोव्हेंबरला संपणार आहे. त्यापूर्वी राज्यात नवी विधानसभा अस्तित्वात येणं आवश्यक आहे, त्यानुसार आजच्या निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेत निवडणुकीची घोषणा करण्यात आली. महाराष्ट्रात दिवाळीनंतर म्हणजे 20 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. 23 नोव्हेंबरला मजमोजणी पार पडणार आहे.

महाराष्ट्रात एकूण जिल्हे – 36 जागा 288, मतदान केंद्र 100186 व 9 कोटी 3 लाख मतदार आहेत.

महाराष्ट्रात 234 जनरल जागा आहेत. एसटी प्रवर्गासाठी 25 जागा आहेत. तर 29 जागा या अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव आहेत. त्यासाठी राज्यात ९ कोटी ६३ लाख मतदार मतदान करतील. त्यासाठी महाराष्ट्रात १ लाख १८६ निवडणूक केंद्र असतील. ग्रामीण आणि शहरी भागात मतदार केंद्र आहेत.

एकाच टप्प्यात निवडणूक
22 ऑक्टोबर रोजी नोटिफिकेशन

29  ऑक्टोबर अर्ज भरण्याची तारीख

30  ऑक्टोबर अर्ज छाननी

4 नोव्हेंबर अर्ज मागे घेण्याची तारीख

20  नोव्हेंबर रोजी मतदान

23 नोव्हेंबर रोजी निकाल

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!