ब्रदर देशपांडे मेमोरियल चर्चमध्ये नाताळ ख्रिसमस निमित्त विशेष उपासना
पुणे, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l नाताळ ख्रिसमस निमित्त कसबा पेठ येथील ब्रदर देशपांडे मेमोरियल चर्चमध्ये विविध कार्यक्रम घेण्यात आले, यामध्ये नाताळ पहाट क्रिस्तागमन, नाताळ विशेष उपासना पाककला स्पर्धा, लहान मुलांसाठी विविध खेळ स्पर्धा, शालेय विद्यार्थ्यांचा कलागुण दर्शन कार्यक्रम आदि कार्यक्रम झाले, यावेळी ब्रदर देशपांडे मेमोरियल चर्च चे अध्यक्ष रेव्ह, विल्सन पंडित, सचिव नोएल देठे, खजिनदार राजेंद्र (मोहन) शिंदे, आदि उपस्थित होते.
या पूर्वीही याव्हे निस्सी ख्रिश्चन असोसिएशनच्या वतीने नाताळनिमित्त गोरगरीब ख्रिश्चन बांधवांना आनंदाचा शिधा वाटप गुरुवार पेठ येथील पवित्र नाम देवालय पंच हौद पॅरिस हॉल मध्ये करण्यात आले होते.
यावेळी रेव्ह, जे एम गायकवाड, पास्टर मिलिंद मोरे, रोझमेरी साठे, शिवसेना पुणे शहर वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख अजय सपकाळ, राजेंद्र बडदे, सिद्धार्थ कुलकर्णी, प्रकाश ढोरे, शिवसेना कसबा विधानसभा प्रमुख निलेश जगताप आदि यावेळी, उपस्थित होते कार्यक्रमाचे आयोजन याव्हे निस्सी क्रिश्चन असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष नितीन गोडेँ, सचिव अनिल गडकरी, खजिनदार प्रकाश नानिवडेकर आदींनी केले,