महाराष्ट्रशैक्षणिक

SSC Exam : आज पासून दहावीची परीक्षा, १६ लाख ११ हजार ६१० विद्यार्थी बसणार परीक्षेला

पुणे, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l राज्यात आज २१ फेब्रुवारी २०२५ पासून महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाच्या माध्यमांतून दहावीची परीक्षा सुरू होत आहे. तर परीक्षेला १६ लाख ११ हजार ६१० विद्यार्थी बसले आहेत. तर यामध्ये ८ लाख ६४ हजार १२० मुले, ७ लाख ४७ हजार ४७१ मुली, तर १९ ट्रान्सजेंडर परीक्षा देणार आहेत. तर २३ हजार ४९२ माध्यमिक शाळांमधून विद्यार्थ्यांची नोंदणी केली आहे. तर ५ हजार १३० मुख्य केंद्रांवर परीक्षा होणार असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

ही परीक्षा १७ मार्चपर्यंत सुरु राहणार असून मुंबई, कोकण, पुणे, नाशिकह राज्यभरातील आठ विभागीय मंडळांमार्फत ही परीक्षा घेतली जाणार आहे.

दहावीच्या परीक्षेतील गैरप्रकार टाळण्यासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून राज्यातील ७०१ केंद्रांतील संपूर्ण स्टाफ बदलण्यात आला आहे. त्यामध्ये पुणे १३९, नाशिक ९३, नागपूर ८६, मुंबई १८, कोल्हापूर ५४, लातूर ५९ या विभागाचा समावेश करण्यात आला आहे. तर राज्यातील परीक्षा केंद्रावर जिल्हा प्रशासनामार्फत ड्रोन कॅमेराव्दारे निगराणी राहणार असल्याचेही मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यानी सांगितले.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!