एस टी बसची दुचाकीला धडक ; यावल तालुक्यातील महिलेचा जागीच मृत्यू
रावेर, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l लग्न समारंभासाठी मध्यप्रदेशातील बंभाळा येथे गेलेल्या लग्न व ओवाळनीचा कार्यक्रम आटोपून मोटर सायकलवरून घरी येत असताना
महामंडळच्या एम १४ बीटी ३९१६ या नंबरच्या बस चालकाने मोटर सायकलला धडक दिल्याने अपघात झाला. या अपघातात मोटर सायकलवर मागे बसलेल्या आरती संदीप पाटील यांचा रावेर शहरा जवळ जागीच मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, आरती संदीप पाटील यांना दोन मुली आणि एक मुलगा असून त्या यावल तालुक्यातील बामणोद येथील रहिवाशी असून या दुर्दैवी घटनेमुळे त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. बस आणि मोटर सायकलच्या धडकेनंतर बसला रावेर पोलिस स्टेशनमध्ये आणण्यात आले असून, अपघाताबाबत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.