भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईममहाराष्ट्र

Breaking : एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांना मुंबई पोलिसांकडून अटक

मुंबई, मंडे टू मंडे वृत्तसेवा : एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्तेंना पोलिसांकडून अटक करण्यात आलीय. सरकारी कामात अडथळा आणला आणि कटात सामील असल्याचा ठपका ठेवत ही अटक झाली आहे. शरद पवारांच्या घराबाहेर एसटी कर्मचाऱ्यांनी (ST Workers) जे आक्रमक आंदोलन केले. त्याच प्रकरणी गुणरत्न सदावर्तेंच्या अडचणी वाढल्या आहेत.

शुक्रवारी दुपारी जे आक्रमक आंदोलन झालं त्या आंदोलनानंतर राज्याच्या राजकारणातला पारा चांगलाच चढला होता. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरत गुणरत्न सदावर्ते यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करत होते. तसेच या प्रकरणावर तीव्र राजकीय प्रतिक्रिया उमटत होत्या. गुणरत्न सादवर्ते यांनी गुरूवारी कोर्टाने निर्णय दिल्यानंतर आझाद मैदानात जे भाष्य केलं. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांच्या भावना भडकल्याचा आरोप होतं आहे. आझाद मैदानातून त्यांनी बारामतीत येऊन आंदोलन करू आम्हाला थांबवून दाखवा असा थेट इशारा शरद पवारांना दिला होता.

एसटी कर्मचाऱ्यांनी आज दुपारच्या सुमारास शरद पवारांच्या सिल्वर ओक या घराबाहेर आंदोलन केलं. यावेळी संतप्त कर्मचाऱ्यांनी दगडफेक आणि चप्पलफेकही केली. या प्रकरणात मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून 105 कर्मचाऱ्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. त्यासोबतच एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांनाही पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलं आणि चौकशीनंतर अटकेची कारवाई केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जमावाला भडकवणे, कट रचणे या गुन्ह्या अंतर्गत वकील गुणरत्न सदावर्ते यांना पोलिसांनी अटक केली आहे. चौकशीनंतर पोलिसांनी सदावर्ते यांना अटक केली आहे. थोड्याच वेळात गुणरत्न सदावर्ते यांना वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात नेण्यात येणार असल्याची माहिती असून उद्या न्यायालयात हजर केले जाणार आहे.मुंबई पोलिसांनी ताब्यात घेताच वकील गुणरत्न सदावर्ते यांनी एक गंभीर आरोप केला आहे. पोलिसांनी मला कुठल्याही प्रकारची नोटीस न देता चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. माझ्या पत्नीने गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. माझ्या जीवाला धोका असून माझी हत्या होऊ शकते असंही गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटलं आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!