जादा भावात स्टॅम्प विक्री, स्टॅम्प वेंडर व झेरॉक्स चालक एसीबी च्या ताब्यात
जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | जळगाव जिल्ह्यात शासकीय स्टॅम्प विक्रीमध्ये अतिरिक्त पैसे उकळण्याचा प्रकार उघडकीस आला असून, पाच हजार रुपयांच्या स्टॅम्पसाठी ५०० रुपयांची लाच घेताना स्टॅम्प वेंडर योगेश ईश्वरलाल संघवी (वय ४९) व झेरॉक्स दुकानदार प्रशांत ईश्वरलाल संघवी (रा. विवेकानंद नगरी, पाचोरा) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने मंगळवारी (दि. १७) रंगेहाथ पकडले. या प्रकरणी पाचोरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक माहिती अशी की, तकारदार हे दि.१५.०३.२०२६ रोजी पाचोरा शहरातील जामनेर पाचोरा रोडवरील प्रशांत झेरॉक्स येथे ५००/- रू. दराचे १० स्टॅम्प घेण्यासाठी गेले होते. तेव्हा सदर दुकानावरील अधिकृत स्टॅम्प वेंडर योगेश संघवी यांनी त्यांना ५००/- रू. वा स्टॅम्पत्ती किंमत ५५०/- रू. सांगितली. तेव्हा तक्रारदार हे त्यांना ५००/- रू वा स्टॅम्प तुम्ही ५५०/- रू ला देतात का? शासकिय नियमानुसार स्टॅम्पची किंमत ५००/-रू असतांना तुम्ही ५०/- रू जास्त का घेत आहेत ? असे विचारले असता स्टॅम्प वेंडर योगेश संघवी त्यांना म्हणाले की, ५५०/- रुपयेच लागतील, त्यात काही कमी होणार नाही. तेव्हा त्यांच्या लक्षात आले की, स्टॅम्प वेंडर योगेश संघवी हे स्टॅम्प पेपरच्या शासकिय नियमानुसार असलेल्या किंमतीपेक्षा अतिरिक्त पैशांची मागणी करीत आहेत. त्यावेळी त्यांच्याकडे आधारकार्ड नसल्यामुळे त्यांनी तक्रारदार यांना आधारकार्ड घेवुन या, तेव्हाच तुम्हाला स्टॅम्प भेटतील, असे सांगितले होते. त्यामुळे त्यादिवशी तक्रारदार हे तेथुन परत घरी निघुन गेले. या बाबत तक्रारदार यांनी दि.१७.०३.२०२६ रोजी ला.प्र.वि. जळगाव घटकाचे सापळा पथकाकडे तक्रार लिहून दिली होती.
त्याप्रमाणे दि. १७.०३.२०२६ रोजी सदर तक्रारीची पडताळणी केली असता तकारदार यांनी त्यांचे तक्रारीत नमुद केलेप्रमाणे तकारदार यांचेकडे योगेश ईश्वरलाल संघवी यांनी पंचासमक्ष तक्रारदार यांच्याकडे ५००/-रू दाराच्या १० स्टॅम्पचे ५,०००/- रू होत असतांना ५,५००/-रूपयांची मागणी करून अधिकचे ५००/-रूपयांची मागणी केली.
त्या नंतर योगेश ईश्वरलाल संघवी,यांचे भाऊ आरोपी प्रशांत ईश्वरलाल संघवी, यांनी देखिल तकारदार यांच्याकडे ५००/-रू दाराव्या १० स्टॅम्पवे ५,०००/- रू होत असतांना ५,५००/-रूपयांची मागणी करून अधिकचे ५०० रूपयांची मागणी करून सदरत्ती लात्त रक्कम पंचासमक्ष स्वतः स्विकारली.
या प्रकरणी योगेश ईश्वरलाल संघवी, वय ४९ वर्षे, व्यवसाय स्टॅम्प वेंडर, प्रशांत ईश्वरलाल संघवी, वय ५३ वर्षे, व्यवसाय झेरॉक्स दुकान, (खाजगी इसम) दोन्ही रा. प्लॉट नं. ४१, विवेकानंद नगर, भडगांव रोड पाचोरा, जि. जळगांव, याना रंगेहात पकडून गुन्हा दाखल करण्यात आला असून सदरची कारवाई पर्यवेक्षण अधिकारी योगेश ठाकूर, पोलीस उपअधीक्षक, ला.प्र.वि. जळगांव सापळा अधिकारी हेमंत नागरे, पोलीस निरीक्षक, ला.प्र.वि. जळगांव सापळा पथक :- पो.अं. बाळु मराठे, पो.अं. भुषण पाटील, ला.प्र.वि. जळगांव तपास अधिकारी श्रीमती स्मिता नवघरे पोलीस निरीक्षक, ला.प्र.वि. जळगांव यांनी केली.


