मुक्ताईनगर

जळगांव हवाई सेवा पूर्ववत करून पुणे व इंदौर विमानसेवा सुरु करा– खा. रक्षा खडसेची विमान वाहतूक मंत्र्याकडे मागणी

मुक्ताईनगर, मंडे टु मंडे न्युज प्रतिनिधी| महाराष्ट्र राज्यातील जळगाव विमानतळावरून अहमदाबाद – जळगांव – मुंबई व मुंबई – जळगांव – अहमदाबाद ही विमानसेवा तात्काळ पूर्ववत करा तसेच जळगांव – पुणे व जळगांव – इंदौर हे नवीन हवाई-कनेक्‍टिव्हिटी मार्ग स्थापन करण्यासाठी योग्येती कार्यवाही करा अशी मागणी खासदार श्रीमती रक्षा खडसे यांनी आज नागरी विमान वाहतूक मंत्री श्री.ज्योतिरादित्य सिंधिया यांची दिल्ली येथे भेट घेऊन केली.

जळगाव विमानतळावरून अहमदाबाद व मुंबई येथे सुरु असलेली विमानसेवा पुन्हा सुरू करणे तसेच जळगांव – पुणे व जळगांव – इंदौर असे नवे मार्ग स्थापन करण्यासाठी मागील वर्षापासून अनेक वेळा पत्र व्यवहार केलेला असून गेल्या नऊ महिन्यांपासून ट्रुजेट एअरवेजचे मार्फत जळगावसह सर्व विमानतळावरील वाहतूक बंद असल्याने विमानतळावर कर्मचारीही उपलब्ध नाहीत. त्यासाठी ट्रुजेट एअरवेजला उपलब्ध करून दिलेला उडान योजनेचा आरसीएस स्लॉट देशांतर्गत हवाई सेवा देणाऱ्या इतर विमान कंपन्यांना सुद्धा उपलब्ध करून देण्यात यावा.

तसेच जळगांव विमानतळावर कमी दृश्यमानतेमध्ये आणि रात्रीच्या वेळी विमान उतरू शकण्याची सुविधा आयएफआर, बीसीएएस कडून कार्गो हाताळणीची परवानगी तसेच, श्रेणी – ५ अग्निशमन सेवा उपलब्ध असून सदर विमानतळावर उडान योजनेच्या आरसीएस स्लॉट मध्ये समाविष्ठ नसलेल्या हवाई मार्गावरील सेवा सुरु करणे बाबत लवकर कार्यवाही करावी अशी मागणी खासदार श्रीमती रक्षा खडसे यांनी नागरी विमान वाहतूक मंत्री श्री.ज्योतिरादित्य सिंधिया यांच्याकडे केली असता, लवकरच याबाबत खाजगी विमान कंपन्यांशी चर्चा करून जळगांव विमानतळ येथे सदर हवाई सेवा उपलब्ध करणे बाबत यावेळी त्यांनी आश्वासन दिले.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!