राज्य उत्पादन शुल्क विभागाची तासखेडा अवैध दारू वॉश मोहीम म्हणजे चंमकोगिरी ? उदळी, रायपूर येथील दारू विक्रेत्यांना अच्छे दिन…
सावदा, ता. रावेर. मंडे टू मंडे न्युज नेटवर्क | तासखेडा येथिल ग्रामपंचायत सदस्य विनोद कोळी याना घेऊन गावातील महीलांनी दि ०४/०७/२४ रोजी गावात होत असलेल्या अवैध दारू विक्री विरोधात सावदा पोलीस स्टेशनला आक्रोष मोर्चा काढला होता. व तशीच तक्रार राज्य उत्पादन शुल्क विभाग भुसावळ यांना सुद्धा दिली होती. लागलीच बातम्या झळकल्या आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाचा ताफा पहाटेच तासखेडा येथे धडकला व धाडी सत्र सुरु केले. त्यात दोन ठिकाणी धाड टाकूण ६५ लिटर गावठी दारु हस्तगत करून दारू विक्रेत्यांवर कारवाई केली . त्या दिवसा पासून तर आज पर्यंत तासखेडा गावामध्ये कुठल्याही प्रकारची अवैध दारू विक्री झालेली नाही. मात्र तळीरामांची गंमत “जैसे थे” म्हणजे ज्या उद्देशाने हा आक्रोष मोर्चा काढण्यात आला होता, तो पूर्णत फोल ठरला.
“तू नहीं तो कोई और सही”
दारू बंदी फक्त तासखेडा गावात झाली. पण याचा परिणाम शेजारील गावात झाला. “तू नहीं तो कोई और सही” शेजारील गावांत मात्र दारु विक्रीचा विक्रमच मोडला. कारण तासखेडा येथील तळीराम उदळी तसेच रायपुर येथे जाऊन आपला गळा ओला करत आहे व पुन्हा येणे शक्य नसल्याने कॉटर असो वा पन्नी दारू आपल्या सोबत पार्सल म्हणुन घेत आहेत.
उदळी, रायपूर येथील दारू विक्रेत्यांना अच्छे दिन –
यात उदळी व रायपुर येथिल अवैध दारू विक्री व्यवसाय करणारांचे अच्छे दिन आल्याचे चित्र दिसत आहे. या दारूबंदी साठी काढलेल्या आक्रोश मोर्चाने काय फलित झाले हा निकष लावणे कठीण मात्र एक निकष पक्का ठरला. तो म्हणजे दारु पिणाऱ्याचे पिण्याचे प्रमाण कमी न होता उलट अधिक वाढले. कारण “तासखेड्याला नाही भेटत तर उदळी रायपुर जाईल पण दारू मात्र नक्की पिऊन येईल,” असा प्रकार घडत आहे.
(भाग – १)
उद्या २५ जुलै – भाग -२