सावदा येथील ऋषिकेश पाटील यांना राज्यस्तरीय “जाणीव पुरस्कार”
सावदा, ता. रावेर. मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | रावेर तालुक्यातील सावदा येथील युवा उद्योजक ऋषिकेश पाटील यांना जाणीव सांस्कृतिक अभियान (संस्थापक अध्यक्ष शिवाजी जगन्नाथ माधवराव पाटील ) या संस्थेकडून राज्यस्तरीय “जाणीव पुरस्कार” प्रदान करण्यात आला.
जाणीव सांस्कृतिक अभियान संस्था या राष्ट्रीय उपक्रमशील संस्थेच्या वतीने सामाजिक ,सांस्कृतिक, शैक्षणिक, राजकीय ,प्रशासकीय आदी क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्तींना सामाजिक कृतज्ञता म्हणून दिला जाणारा राज्यस्तरीय “जाणीव पुरस्कार” रावेर तालुक्यातील सावदा येथील ओम कोल्ड स्टोरेज चे संस्थापक, युवा उद्योजक ऋषिकेश सुनील पाटील यांना जळगाव येथे झालेल्या कार्यक्रमात इतिहासाचार्य तथा जिजाऊ फेम प्राचार्या डॉ स्मिता देशमुख व आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या हस्ते दि . १० मे २०२५ रोजी झालेल्या कार्यक्रमात प्रदान करण्यात आला.
या वेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते रत्नाकर बळीराम चौधरी हे होते तर प्रमुख पाहुणे देविदास (बापू ) बोरसे,राज्याध्यक्ष निसर्ग मित्र समिती,महाराष्ट्र राज्य, तसेच संतोष मराठे, सामाजिक कार्यकर्ते बोईसर. उपस्थित होते.
सावदा येथील ओम कोल्ड स्टोरेज चे संस्थापक, युवा उद्योजक ऋषिकेश सुनील पाटील यांना राज्यस्तरीय “जाणीव पुरस्कार” मिळाल्या बद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.