राज्य उत्पादनची मुक्ताईनगर तालुक्यात नकली दारूच्या कारखान्यावर कारवाई; स्थानिक पोलीस प्रशासन मात्र झोपेत !
मुक्ताईनगर प्रतिनिधी, अक्षय काठोके | राज्य उत्पादन शुल्काच्या पथकाची मुक्ताईनगर तालुक्यातील रुईखेडा येथे नकली दारूच्या कारखान्यावर कारवाई करत 17 लाखाचा मुद्देमाल जप्त केला असून एवढ्या मोठ्या प्रमाणात दारूचे उत्पादन होत असताना स्थानिक पोलीसां याची कल्पना नव्हती का असा या कारवाईने तालुक्यात चर्चिला जात आहे.
तालुक्यातील रुईखेडा येथे 23/ 11 च्या मध्यरात्री राज्य उत्पादन शुल्काच्या पथकाने रुईखेडा येथे पोल्ट्री फार्म मध्ये चालणाऱ्या बनावट देशी दारूच्या कारखान्यावर छापा टाकून कामगार असलेले तीन आरोपींना रगेहाथ अटक केली व त्यांच्याकडून 17 लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला खरा मात्र मोठे मासे उत्पादन शुल्क विभागाच्या हाती लागल्यावाचून राहिले. एवढी मोठी कारवाई राज्य उत्पादन शुल्क भुसावळ वरून येऊन करते परंतु स्थानिक बिट हवालदार काय करताय असा प्रश्न नागरिक विचारत असून कारखाना ज्या शेतात चालू होता त्या शेतमालकाचे नाव काय हेही अजून कोडंच असून याबाबत प्रशासन खुलासा करण्याची व कारवाईची माहिती जनतेसमोर येण्याची गरज असल्याने जनतेकडून खुलास्याची मागणी होत आहे.
शहरासह तालुक्यात बेकायदा दारू, गावठी दारूचे अड्डे, राष्ट्रीय तसेच राज्यमार्गालगत हॅाटेल आणि ढाब्यावर बेकायदा देशी विदेशी दारूचा साठा आणि त्याची खुलेआम होत असलेली विक्री तालुक्यात बेकायदा दारू तयार केली जाते आणि त्यांची विक्री केली जाते याची बहुतेक कल्पना पोलीस प्रशासनाला नसावी असे होऊ शकत नाही. राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून तालुक्यात ही कारवाई केली जात असताना स्थानिक पोलीस प्रशासनाने अधिकारी नेमके करतात तरी काय ? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.
उत्पादन शुल्क विभागाचे पथक एवढी मोठी कारवाई करत मात्र,. रुईखेदा परिसरातील बीट हवलदार व पोलीस अधिकाऱ्यांना बनावट दारूच्या कारखान्याबाबत माहिती नसणे म्हणजे आश्चर्य व्यक्त होत आहे. सध्या स्थानिक पोलीस प्रशासन मात्र झोपेत असल्याचे दिसून येते पोलीस निरीक्षक शंकर शेळके दिवाळीपासून मेडिकल टाकून सुट्टीवर आहे कायमस्वरूपी मुक्ताईनगर उपविभागीय अधिकारी (डीवायएसप) मिळेना त्यामुळे मुक्ताईनगर तालुका वाऱ्यावर आहे याच कारणामुळे अवैध धंदे सुद्धा मोठ्या प्रमाणात बोकालले असून नवनियुक्त पोलीस अधीक्षक एम राजकुमार यांनी लक्ष घालण्याची गरज असल्याचे नागरिकात मधून इच्छा व्यक्त होत आहे.