लोकसभा क्षेत्रातील राज्य मार्गांना राष्ट्रीय महामार्गांचा दर्जा द्यावा– खासदार खडसे
मुक्ताईनगर, मंडे टू मंडे न्युज प्रतिनिधी : रावेर लोकसभा मतदारसंघातील राज्य महामार्गांना राष्ट्रीय महामार्ग दर्जा देण्यात यावा याबाबत खासदार रक्षा खडसे यांनी रस्ते वाहतूक व महामार्ग केंद्रीय मंत्री मा.श्री.नितीनजी गडकरी यांची दिल्ली येथे भेट घेऊन मागणी केली आहे.
रावेर लोकसभा क्षेत्रातील १. नशिराबाद-सूनसगाव- कुऱ्हा-बोदवड- मलकापूर-शेगाव रस्ता, २. सावदा- हतनूर-चांगदेव- कोथळी-हरताळा- माळेगाव-बोदवड फाटा रस्ता, ३. फागणे-अमळनेर- चोपडा-खरगोन (मध्यप्रदेश) रस्ता व ४. पाचोरा-वरखेडी- शेंदुर्णी-पहुर रस्ता हे राज्य महामार्ग असून यांच्यावर खूप मोठ्या प्रमाणात दळणवळण असते सदर रस्त्यांची स्थिती ही अत्यंत दयनीय असून सदर रस्त्यांना पाहिजे तसा निधी उपलब्ध होत नाही; त्यामुळे सदर राज्यमार्ग यांना राष्ट्रीय महामार्ग दर्जा देऊन वार्षिक आराखड्यात समाविष्ट करून निधी उपलब्ध करावा अशी मागणी खडसे यांनी केली आहे।.
तसेच मध्यप्रदेश, महाराष्ट्र व गुजरात या तीन राज्यांसाठी महत्वपूर्ण असलेला बुऱ्हानपूर-अंकलेश्वर हा महामार्गाच्या राष्ट्रीयकरणाला गती देण्यात येऊन तत्काळ त्यांची सुधारण करण्यात यावी अशी मागणी यावेळी रस्ते वाहतूक व महामार्ग केंद्रीय मंत्री श्री.नितीनजी गडकरी यांच्याकडे केली.