क्राईममुक्ताईनगर

नाभिक समाजा बद्दल आक्षेपार्ह शब्द वापरल्या बद्दल सकल नाभिक समाजातर्फे तहसील दारांना निवेदन

मुक्ताईनगर, मंडे टु मंडे न्युज प्रतिनिधी | जयंत पाटील यांनी नाभिक समाजाबद्दल अक्षपार्य भाषेत चुकीचे शब्द वापरल्याबद्दल आज मुक्ताईनगर तहसील कार्यालय येथे सकल नाभिक समाज मुक्ताईनगर तालुका तर्फे निवेदन देण्यात आले.

मुक्ताईनगर तहसीलदारांना दिलेल्या निवेदनाद्वारे इशारा देण्यात आला आहे की, अधिवेशन सुरू असताना राष्ट्रवादी पक्षाचे नेते श्री जयंत पाटील यांनी आपल्या भाषेत नाभिक समाजाबद्दल आक्षेपार्य भाषेत चुकीचे शब्द वापरल्याबद्दल संपूर्ण नाभिक समाजाचा भावना दुखावले आहे. त्यामुळे जयंत पाटील यांनी संपूर्ण नाभिक समाजाची माफी मागावी अन्यथा नाभिक समाजा द्वारे तीव्र आंदोलन करण्यात येईल.अशा घाणेरड्या व्यक्तीचा व वृत्तीचा जाहीर निषेध नाभिक समाज करीत आहे. असे निवेदनात म्हटले आहे.

निवेदन देते वेळी प्रशांत उर्फ गणेश टोंगे (नाभिक समाज तालुकाध्यक्ष), किशोर हातकर, विजय टोंगे(जिल्हा सदस्य) , कडू सनांसे(जिल्हा सदस्य), नितिन सनांसे(सचिव) नितिन चव्हाण,(उपाध्यक्ष) सुनील श्रीखंडे, स्वप्नील श्रीखंडे,नितिन शिरनामे,संजय टोंगळे, उमेश लोंढे, अजय श्रीखंडे, सुमित सनांसे(प्रसिध्दी प्रमुख), प्रमोद सनांसे, प्रशांत सनांसे, भगवान लोंढे, सुशांत ठाकरे,दिवाकर श्रीखंडे, ई. नाभिक समाज बांधव उपस्थित होते.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!