क्राईमजळगाव

गॅस सिलिंडरचा बेकायदेशीर साठा, ७३ सिलेंडर पकडले

जळगाव, मंडे टू मंडे न्युज नेटवर्क l गॅस सिलिंडर च्या ७३ गॅस हंड्या खाजगी वाहनांमध्ये गॅस भरण्याच्या उद्देशाने बेकायदेशीर साठा केल्याने जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शिरसोली येथे सादिक पिंजारी यास ताब्यात घेतले. त्याच्या कडून ७३ सिलेंडर सह गॅस भरण्याचे मशीन, नळ्या, एक रिक्षा असा एकूण ५ लाख २९ हजार ६०० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई २९ सप्टेंबर रोजी करण्यात आली.

या बाबत जळगाव एम आय डी सी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलिस निरीक्षक बबन आव्हाड, पोलिस निरीक्षक दत्तात्रय निकम,पोलिस उप निरीक्षक दत्तात्रय पोलते, अतुल वंजारी,विजय पाटील,प्रदीप चवरे,ईश्वर पोटील, अधिकार पाटील, प्रदीप सपकाळे आदी पथकाने केली.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!