भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमजळगाव

ब्रेकिंग | शिवजयंती मिरवणूकीवर अज्ञात समाजकंटकांकडून दगडफेक;  दंगा नियंत्रण पथक दाखल !

जळगाव-मंडे टू मंडे न्यूज नेटवर्क ।  तालुक्यातील शिरसोली येथे शिवजयंतीनिमित्त प्र.बो. गावातील वराड गल्लीत सुरू असलेल्या मिरवणुकीवर गुरुवारी २८ मार्च रोजी अज्ञात समाजकंटकांनी तुफान दगडफेक झाल्याची घटना घडली असून या दगडफेकीत सुमारे ५ ते ६ जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. एमआयडीसी पोलिसांचा ताफा घटनास्थळी पोहोचला असून दंगा नियंत्रण पथक तळ ठोकून आहे.

तालुक्यातील शिरसोली प्र. बो. येथे गुरूवार २८ मार्च रोजी तिथीप्रमाणे शिवजयंती साजरी करण्यात येत आहे. या अनुषंगाने जळगाव तालुक्यातील शिरसोली प्र.बो. गावातील इंदीरा नगरातून सायंकाळच्या सुमारास मिरवणूक मोठ्या जल्लोषात काढण्यात आली होती. ही मिरवणूक रात्री ८ वाजता गावातील वराड गल्लीतील मस्जिद धार्मीक स्थळाजवळ जात असतांना अचानक घरावरुन अज्ञात समाजकंटकांनी दगडफेक सुरु केली. या मिरवणूकीवर दगडफेक आणि विटा फेकून मारल्याने मिरणूकीत सहभागी असलेले नागरीक आणि काही पोलीस कर्मचारी असे ५ ते ६ जण जखमी झाल्याचे वृत्त समोर आले आहे. जखमींना तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रवाना करण्यात आले.

याप्रकरणी पोलिसांनी धरपकड सुरु केली असून आतापर्यंत १० ते १२ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. बंदोबस्तावर असलेले पोलिसदेखील जखमी झाल्याचे वृत्त प्राप्त असून एमआयडीसी पोलीस स्टेशनला घटनेची माहिती मिळताच निरीक्षक बबन आव्हाड हे घटनास्थळी सहकाऱ्यांसह दाखल झाले. त्यासोबत दंगा नियंत्रण पथकाने घटनास्थळी येऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. घटनेत मंगेश साहेबराव पाटील (वय ३०), बाळू तुळशीराम पाटील (वय ४५) यांच्यासह ५ ते ६ जण जबर जखमी आहेत. घटनास्थळी अजूनही तणावाचे वातावरण आहे. घटनास्थळी पोलिस अधीक्षक उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित हे पोहोचले आहेत. जखमींना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्याचे काम सुरु होते.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!