ब्रेकिंग : धार्मिक स्थळाचे अतिक्रमण काढण्याच्या कारणावरून जळगाव मध्ये वकिलाच्या घरावर दगडफेक
जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार जळगाव शहरातील प्रताप नगर येथील एका धार्मिक स्थळाचे अतिक्रमण काढण्याच्या कारणावरून जमावाने जोरदार घोषणाबाजी करत ॲड. सुशील अत्रे यांच्या घरावर दगडफेक केली. यामुळे मोठा गोंधळ उडाला. ही घटना १८ ऑक्टोबर शुक्रवार रोजी रात्री ११ वाजता घडली.
या संदर्भात मिळालेली अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील प्रताप नगर परिसरातील एका धार्मिक स्थळाचे अतिक्रमण असण्याच्या कारणावरून गेल्या अनेक वर्षांपासून तक्रार आहे. या संदर्भात न्यायालयाकडून हे अतिक्रमण काढण्याचे आदेश देण्यात आल्याने प्रताप नगर परिसरातील ते काढण्याची प्रक्रिया सुरू आहे. या अतिक्रमण काढण्याच्या प्रक्रियेवरून काहीजण संतप्त झाले. अतिक्रमण काढण्याच्या रागावरून १८ ऑक्टोबर मंगळवार रोजी रात्री ११ ते ११.३० वाजेच्या सुमारास मोठा जमाव प्रताप नगर परिसरातील धार्मिक स्थळाच्या ठिकाणी जमला व अतिक्रमण काढण्यास विरोध दर्शवत जमावाने धार्मिक स्थळापासून जवळच असलेल्या ॲड. सुशील अत्रे यांच्या घरावर दगडफेक केली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर जिल्हा पेठ पोलीस घटनास्थळी पोहोचले. तेथून १० ते १२ जणांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती मिळत असून रात्री उशिरापर्यंत नोंद घेण्याचे काम सुरू होते.