हॉटेल,उद्योगांना एलपीजी गॅस सिलेंडर देणं बंद! केंद्र सरकारचा मोठा निर्णय
मुंबई, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | युद्धामुळे निर्माण झालेली भीषण परिस्थिती पाहता, केंद्र सरकारने हॉटेल, रेस्टॉरंट आणि उद्योगांना एलपीजी सरकारी आता हा गॅस केवळ घरगुती वापरासाठीच पुरवण्यात येईल. या गॅसचा पुरवठा केवळ कारी कंपन्यांद्वारेच करता येणार आहे, असा आदेश केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने काढला आहे. या निर्णयामुळे हॉटेल, रेस्टॉरंट आणि उद्योगांना मोठा धक्का बसला आहे.
घरगुती सिलिंडरचा तुटवडा एकीकडे व्यावसायिक गॅस बंद झाला असताना, दुसरीकडे घरगुती ग्राहकांनाही वेळेवर सिलिंडर मिळेनासे झाले आहेत. गॅस एजन्सीकडून ग्राहकांना पुढील महिनाभर सिलिंडर मिळणार नाही, असे सांगितले जात आहे. यामुळे गॅसचा काळाबाजार वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.
६० रुपयांनी महागले घरगुती एलपीजी सिलिंडर
सर्वसामान्यांच्या स्वयंपाकघरावर पुन्हा महागाईचा भार वाढला आहे. १४.२ किलो वजनाच्या घरगुती एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतीत ६० रुपयांची वाढ करण्यात आली आहे. नव्या दरानुसार दिल्लीमध्ये १४.२ किलोचे घरगुती गॅस सिलिंडर आता ८५३ रुपयांवरून २१३ रुपयांवर गेले आहे. वाढीव दर ७ मार्चपासून लागू होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
हॉटेल, उद्योग बंद पडण्याची भीती
सीएनजीच्या बाबतीत परिस्थिती तुलनेने बरी म्हणावी अशी आहे. देशांतर्गत उत्पादनातूनच सीएनजीची मोठी गरज भागवली जात आहे. ज्या ठिकाणी सीएनजी उपलब्ध आहे, तेथे उद्योगांनी एलपीजीऐवजी सीएनजीचा वापर सुरू केला आहे. मात्र, देशातील बहुतांश भागात सीएनजी नेटवर्क उपलब्ध नसल्याने त्या भागातील हॉटेल आणि उद्योग लवकरच बंद पडण्याची भीती आहे.


