गावकऱ्यांचा अजब निर्णय ; ३२ गावांमध्ये “गाव विकणे आहे” चे लागले बोर्ड, तुम्ही आमचे गावचं विकत घ्या …
मंडे टू मंडे न्युज नेटवर्क l कोणत्याही सुविधा न देता भरमसाठ टॅक्स लावल्याने ग्रामस्थ संतप्त झाले, आम्ही टॅक्स भरू शकत नाही. तूम्ही आमचे गावचं विकत घ्या.अशी भूमिका घेऊन पुण्यातील ३२ गावांमध्ये “गाव विकणे आहे” चे बॅनर लागल्याने या बाबत मोठी चर्चा सुरू आहे. ३२ गाव कृती समितीच्या माध्यमातून गावोगावी ३२ गावात असे बॅनर लावून महापालिकेच्या अवाजवी कर धोरणाविरोधात ३२ गावातील ग्रामस्थ चांगलेच आक्रमक झाले आहेत.
महापालिकेने कुठल्याही सुविधा न पुरवता, गावांचा विकास न करता भरमसाठ टॅक्स लावला आहे. पुण्यातील धायरी, नऱ्हे, आंबेगाव किरकटवाडी, नांदोशी,खडकवासला नांदेड, उत्तमनगर, शिवणे, कोंढवे, कोपरे आदी ३२ गावात गावोगावी अशा प्रकारचे बोर्ड लाऊन पुणे महापालिकेचा निषेध व्यक्त केला आहे.
“आम्ही टॅक्स भरू शकत नाही, तुम्ही आमचे गावच विकत घ्या.”अशी भूमिका घेते गाव विकणे आहे ची बॅनर बाजी करत ३२ गावातील ग्रामस्थांनी आक्रमक होत हा निर्णय घेतला आहे. तसेच आंदोलन पुढे सुरूच ठेवून मोठे आंदोलन करण्यात येणार असल्याचे ३२ गाव कृती समिती कडून सांगण्यात आले.