बुलढाण्यात अजब आजार, “टक्कल व्हायरस” ची साथ ! तीन दिवसात पडतंय टक्कल
बुलढाणा, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l आजारचं केव्हा काय स्वरूप असेल हे सांगताचं येत नाही.बया आजारानं चक्क केस गळतीच सुरू झालीय. ऐकावं ते नवलच अशी गोष्ट झाली आहे. बुलढाण्यात सध्या एका विचित्र आजारामुळे दहशत निर्माण झाली आहे. बुलढाण्यातील शेगाव तालुक्यातील नागरिकांना अचानक टक्कल पडल्याची समस्यांना सामोरं जावं लागत आहे. काय आजार आहे हे समजतच नाही आहे.
अचानक केस गळती मुळे नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. केस गळतीमुळे मोठ्यांपासून ते आता लहान मुल देखील चिंतेत असतात. अचानक केस गळती हा मोठा विषय बनला आहे. बदललेली जीवनशैली यामुळे लहान मुलांपासून तरुणांना देखील याचा फटका बसतोय.
बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील बोंडगाव, कालवड, हिंगणा या गावांतील नागरिकांना अचानक केस गळती या अज्ञात आजाराची लागण झाली आहे. यामध्ये नागरिकांना फक्त तीनच दिवसात टक्कल पडतंय. त्यामुळे आता नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण देखील पहायला मिळतंय. मिळालेल्या माहितीनुसार गेल्या काही दिवसात ४५ ते ५० लोकांना टक्कल पाडलं आहे.
या आजारात आधी लोकांच्या डोक्याला खाज सुटते अन् मग केस गळायला लागतात. हे टक्कल शाम्पू वापरणाऱ्या लोकांचे पडत असल्याचा दावा डॉक्टरांनी केला आहे . त्या पैकी काही लोकांनी शाम्पू च वापरला नसल्याचे सांगितले गेले. आरोग्य विभागाने याची लागलीच दखल घेत आरोग्य विभागाची टीम गावात पोहोचली असून नमुने गोळा केले जात आहेत. तसेच आरोग्य विभागाकडून तात्काळ सर्वेक्षणाचे आदेश देखील देण्यात आले आहेत.