आ. चंद्रकांत पाटील जलसमाधी आंदोलन : प्रशासनाकडून १५ दिवसांचे लेखी आश्वासन
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
मुक्ताईनगर, प्रतिनिधी : ओझरखेडा धरणात तातडीने पाणी टाकावे, संबंधित निष्काळजी व बेजबाबदार अधिकार्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी व शेतकर्यांच्या झालेल्या पिकांच्या नुकसानीची भरपाई संबंधित अधिकाऱ्यांकडून वसूल करावी, या मागणीसाठी आमदार तथा शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील यांनी जलसंपदामंत्री जयंत पाटील व जिल्हाधिकार्यांना निवेदन दिले मात्र मागण्या मान्य न झाल्याने सत्ताधारी पक्षाचे जिल्हाप्रमुख असलेले आ.पाटील मंगळवारी जलसमाधी आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर प्रत्यक्षात आंदोलन सुरू केल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. दरम्यान, मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत बाहेर निघणार नाही असा पवित्रा आमदार चंद्रकांत पाटील यांनी घेतल्याने उपविभागीय अधिकारी रामसिंग सुलाने व पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता कडलग यांनी ओझरखेडा धरणावर धाव घेतली तब्बल चार तास चाललेल्या आंदोलना ठिकाणी आंदोलकांना 15 दिवसात पाणी टाकण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन थांबविण्यात आले असून जर 15 दिवसात पाणी टाकण्यासंदर्भात उपाययोजना व संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई न झाल्यास पुन्हा शिवसेनेतर्फे उग्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.
जपसंपदा विभागाच्या दुर्लक्षाने शेतकरी व पिके सापडली संकटात :
सुमारे दिड महिन्यांपूर्वी वरणगाव – तळवेल उपसा सिंचन योजनेंतर्गत असलेल्या ओझरखेडा धरण पाणलोट क्षेत्रातील शेतकर्यांचे केळी व इतर पिके संकटात आल्याने शेतकर्यांनी आमदार चंद्रकांत पाटील यांच्याकडे धाव घेतली होती. त्यानुसार एक महिन्यांपूर्वी आमदार चंद्रकांत पाटील यांनी पाठपुरावा केल्याने पालकमंत्री गुलाबराव पाटील , जिल्हाधिकारी डॉ.अभिजीत राऊत व पाटबंधारे विभागाचे अधिकारी यांची आढावा बैठक झाली. यात ओझरखेडा धरणात तातडीने पाणी सोडण्यासाठी चर्चा होत पालकमंत्र्यांनी नियमित देखभाल दुरुस्ती व पंप दुरुस्तीसाठी तात्काळ कार्यकारी संचालक यांचेशी चर्चा करून निधी उपलब्ध करून दिला होता परंतु जलसंपदा विभागाच्या अधिकारी यांनी आजतागायत गांभीर्य दाखवलेच नाही.
गेल्या महिना भरापूर्वी पूरस्थिती असल्याने हतनूर धरणातून मोठ्या प्रमाणावर पाणी वाया गेले तर याच पाण्याने ओझरखेडा धरणात पाणी टाकले गेले असते तर धरण फुल्ल भरले गेले असते मात्र निव्वळ हलगर्जीपणा संबंधित अधिकार्यांनी केला. यामुळे सदरील धरण कोरडेठाक होण्याच्या मार्गावर असून या पाणलोट क्षेत्रातील हजारो हेक्टर शेत जमिनीतील केळीसह इतर पिके संकटात सापडली आहे. यामुळे शेतकरी प्रचंड हवालदिल झालेले असून शिवसेने पुकारलेल्या जलसमाधी आंदोपनात शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग हा शेतकरी प्रचंड अडचणीत सापडल्याची साक्ष देत होता.
प्रसंगी जिल्हाप्रमुख समाधान महाजन , विधानसभा क्षेत्रप्रमुख सुनील पाटील , बोदवड तालुका प्रमुख गजानन खोडके, मुक्ताईनगर तालुका प्रमुख छोटू भोई, उपतालुका प्रमुख प्रफुल्ल पाटील , नवनीत पाटील, जीवराम कोळी, शिवाजी पाटील, शहर प्रमुख गणेश टोंगे, राजेंद्र हिवराळे, बोदवड शहर प्रमुख हर्षल बडगुजर, शहर संघटक वसंत भलभले, माजी सभापती आनंदराव देशमुख, माजी सभापती चंद्रकांत कारले, माजी सरपंच समाधान कारले, सरपंच दीपक कोळी, पांढरी मुलांडे, अशोक चौधरी, के एन पाटील, रामदास मुलांडे, निवृत्ती भड, उप सरपंच नामदेव भड, सीताराम चवरे, राजू खराटे, आत्माराम दांडगे, बाळू पाटील, दिलीप दांडगे, कैलास सपकाळ, सोपान तायडे,सचिन भड,नितीन महाजन,किसन चव्हाण, मधूकर काळे, ईश्वर कापसे आदी शेतकरी बांधवांसह नगरसेवक संतोष मराठे , मुकेश वानखेडे, संतोष (बबलू) कोळी, आरिफ आझाद, नुरमोहम्मद खान, शकुर जमदार, सलीम खान, जाफर अली , बोदवड नगराध्यक्षा पती सईद बागवान ,नगरसेवक देवा खेवलकर , आनंद पाटील , सुनील बोरसे , संजय गायकवाड , सागर पाटील ,दीपक माळी, नाना बोदडे , लालसिंग पाटील , सचिन पाटील, अमोल व्यवहारे, नरेंद्र गावंडे, किशोर पाटील , सोपान तायडे , वनील कोळी, स्वप्नील श्रीखंडे आदीसंह हजारो शेतकरी व शिवसेना पदाधिकारी तसेच शिवसैनिक बांधव उपस्थित होते.