मध्यप्रदेशात जैन मुनींवरील झालेल्या हल्ल्यांचा मुक्ताईनगर मध्ये निवेदन देत तीव्र निषेध
मुक्ताईनगर, मंडे टु मंडे न्युज प्रतिनिधी |मध्यप्रदेशात जैन मुनींवरील झालेल्या हल्ल्यांचा मुक्ताईनगर मध्ये निवेदन देत तीव्र निषेध करण्यात आला.
मध्यप्रदेशातील जावद विधानसभा क्षेत्रातील सिंगोली गावाजवळ कचोला येथील हनुमान मंदिरात ज्ञानगच्छ संप्रदायतील जैन मुनी प. पू. शैलेष मुनिजी, प. पू. मुनीन्द्र मुनिजी आणि प. पू. बलभद्र मुनिजी यांच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याच्या घटनेने जैन समाजात तीव्र संताप निर्माण झाला आहे. या हल्ल्यातील दोषींना कठोर शिक्षा व्हावी आणि भविष्यात अशा दुर्दैवी घटना घडू नयेत, अशी मागणी मुक्ताईनगर येथील श्री सकल जैन श्री संघाच्या वतीने तहसीलदार साहेब मुक्ताईनगर व पोलीस निरीक्षक साहेब मुक्ताईनगर यांना निवेदन देण्यात आले. यावेळी मुक्ताईनगर शहरातील असंख्य जैन समाज बांधव उपस्थित होते