एन्ड्युरन्स स्टेट चॅम्पियनशिप मध्ये तिर्थराज पाटील या विद्यार्थ्याचं राज्यस्तरीय स्केटिंग स्पर्धेसाठी सिलेक्शन
भुसावळ, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l भुसावळ शहरात सिल्वर लाईन स्पोर्ट्स अकॅडमी भुसावळ आयोजित
एन्ड्युरन्स जिल्हा चॅम्पियनशिपमध्ये जिल्हास्तरीय स्केटिंग स्पर्धा सेंट पाॅल स्कुल साकरी फाटा भुसावळ येथे घेण्यात आली सदर स्पर्धेत दिपनगर, भडगाव, जळगाव, पाचोरा ,अशा अनेक ठिकाणी वरुन स्केटिंग स्पर्धेसाठी विद्यार्थी आलेले होते. या स्पर्धेत वया प्रमाणे गट केले होते त्यामध्ये अंडर 8 या गटा मध्ये कु तिर्थराज मंगेश पाटील भुसावळ या विद्यार्थ्यांचा जळगाव जिल्ह्यात ३ क्रमांक आला आहे व पुढील महिन्यात होणाऱ्या एन्ड्युरन्स स्टेट चॅम्पियनशिपमध्ये राज्यस्तरीय स्केटिंग स्पर्धेसाठी सिलेक्शन झाले आहे.
त्याच्या राज्य स्तरीय निवडीमध्ये सिल्वर लाईन स्पोर्ट्स अकॅडमी चे त्याचे कोच पियुष दाभाडे सर व दीपेश सोनार सर यांची खुप मेहनत आहे असे तिर्थराज पाटील याचे आई व वडिल यांनी सांगितले, तिर्थराज पाटील हा भाजप ओबीसी मोर्चा जिल्हा चिटणीस मंगेश सुभाष पाटील यांचा मुलगा आहे. तीर्थराज चे जळगाव च्या भाजप खासदार स्मिता वाघ यांनी अभिनंदन केले.